मराठी बातम्या /बातम्या /मनी /

BOB, SBI आणि HDFC ग्राहकांसाठी खूशखबर! या बदलाचा होणार मोठा फायदा

BOB, SBI आणि HDFC ग्राहकांसाठी खूशखबर! या बदलाचा होणार मोठा फायदा

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) , बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) किंवा एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. या बँकांनी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) , बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) किंवा एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. या बँकांनी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) , बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) किंवा एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. या बँकांनी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत.

मुंबई, 27 फेब्रुवारी: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) , बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) किंवा एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. या बँकांनी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. बँक ऑफ बडोदाने मुदत ठेवींवरच्या व्याजदरात (interest rates) बदल केला आहे. बँक ऑफ बडोदा आधीच ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर देते. आता ही बँक फिक्स्ड डिपॉझिटवर (FD) व्याजदर वाढवणार आहे. 25 फेब्रुवारीपासून मुदत ठेवींवरच्या व्याजदरात बदल केला आहे. सध्या BOB 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.80 टक्के व्याज देते. बँकेने केलेल्या बदलानंतर 46 ते 180 दिवसांच्या मॅच्युरिटीवर 3.7 टक्के आणि 181 ते 270 दिवसांच्या मॅच्युरिटीवर 4.30 टक्के व्याज मिळणार आहे. तसंच 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.4 टक्के व्याज बँक देणार आहे. एका वर्षात मॅच्‍युअर होणाऱ्या FD वर 5 टक्के व्याजदर आहे. 1 वर्षापेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंतच्या FD वर 5.1 टक्के व्याजदर आहे. तसंच 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत असलेल्या FD वर 5.25 टक्के व्याज आहे. बँक ऑफ बडोदा 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीसाठी 5.25 टक्के व्याज देत आहे. हे वाचा-आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंमलबजावणीला केंद्राची मंजुरी, 1600 कोटींची तरतूद यापूर्वी, एचडीएफसी बँक आणि एसबीआयने एफडीवरच्या व्याजदरात बदल केले होते. याचा थेट फायदा नव्याने एफडी करणाऱ्या ग्राहकांना होत आहे. SBI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 7 दिवस ते 45 दिवसांसाठी 3.30 टक्के व्याज देण्यात येत आहे. 46 ते 179 दिवसांदरम्यानच्या एफडीसाठी 3.90 टक्के दराने व्याज मिळेल. 180 ते 210 दिवसांसाठी नागरिकांना 4.40 टक्के, तर 211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.40 टक्के व्याज मिळेल. 1 वर्षापेक्षा जास्त ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10 टक्के दराने बँक व्याज देईल. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केल्यास बँक 5.20 टक्के दराने व्याज देईल. 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केलं, तर त्यावर तुम्हाला बँकेकडून 5.45 टक्के दराने व्याज मिळेल. तसंच 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या दीर्घ काळासाठी बँकेत पैसे ठेवल्यास त्यावर तुम्हाला 5.50 टक्के व्याज मिळेल. त्यामुळे ग्राहकांना जास्त नफा मिळणार आहे. हे वाचा-Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात वाढ; संपूर्ण आठवड्यात किती दर वाढले? याशिवाय, एचडीएफसी बँकेने एफडी दर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेत एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) केल्यास ग्राहकांना फायदा होईल. नव्या व्याजदरानुसार, 7 ते 14 दिवसांसाठी 2.50 टक्के, 15 ते 29 दिवसांसाठी 2.50 टक्के, 30 ते 45 दिवसांसाठी 3.00 टक्के, 46 ते 60 दिवसांसाठी 3.00 टक्के, 61 ते 90 दिवसांसाठी 3.00 टक्के आणि 91 दिवस ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आलेल्या एफडीवर बँक तुम्हाला 3.50 टक्के व्याज देईल. 6 महिने एक दिवस ते 9 महिने आणि एका वर्षाच्या आतल्या कालावधीसाठी एफडी केलं, तर 4.40 टक्के दराने व्याज मिळेल. एक वर्षाच्या एफडीवरचा व्याजदर 5.00 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षासाठी एफडी केलं, तर त्यावर तुम्हाला 5.00 टक्के व्याजदर मिळेल. 2 वर्षं 1 दिवस ते 3 वर्षांसाठी 5.20 टक्के, 3 वर्षं 1 दिवस ते 5 वर्षांसाठी 5.45 टक्के आणि 5 वर्षं 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीसाठी 5.60 टक्के व्याजदर मिळेल.
First published:

Tags: Bank, Hdfc bank, SBI, Sbi account, Sbi fd rates

पुढील बातम्या