मुंबई, 27 फेब्रुवारी : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीही महाग झाली आहे. या व्यापारी आठवड्यात सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 578 रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) किलोमागे 1513 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (21-25 फेब्रुवारी दरम्यान) 24-कॅरेट सोन्याचा दर 50,089 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,667 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका वाढला आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 63661 रुपयांवरून 65174 रुपये प्रति किलो झाला आहे. IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही. LIC IPO : एलआयसीचे शेअर स्वस्तात हवेत? 28 फेब्रुवारी आधी ‘हे’ काम करा गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले? » 21 फेब्रुवारी 2022- 50,089 रुपये प्रति 10 ग्रॅम » 22 फेब्रुवारी 2022- 50,131 रुपये प्रति 10 ग्रॅम » 23 फेब्रुवारी 2022- 50,049 रुपये प्रति 10 ग्रॅम » 24 फेब्रुवारी 2022- रुपये 52,540 प्रति 10 ग्रॅम » 25 फेब्रुवारी 2022- 50,667 रुपये प्रति 10 ग्रॅम गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला? » 21 फेब्रुवारी 2022- रुपये 63,661 प्रति किलो » 22 फेब्रुवारी 2022- रुपये 64,372 प्रति किलो » 23 फेब्रुवारी 2022- रुपये 64,203 प्रति किलो » 24 फेब्रुवारी 2022- रुपये 68,149 प्रति किलो » 25 फेब्रुवारी 2022- रुपये 65.174 प्रति किलो कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या IFSC, MICR कोडमध्ये बदल होणार, वाचा सविस्तर घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.