Home /News /money /

Sensex ची मोठी उसळी; शेअर बाजाराने गाठली 60 K सर्वोच्च पातळी; या 10 स्टॉक्सनी गुंतवणुकदारांना एका दिवसात दिले लाखो

Sensex ची मोठी उसळी; शेअर बाजाराने गाठली 60 K सर्वोच्च पातळी; या 10 स्टॉक्सनी गुंतवणुकदारांना एका दिवसात दिले लाखो

मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक अर्थात सेन्सेक्स (Sensex) 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. सर्वाधिक कमाई करून देणारे 10 स्टॉक्स कुठले पाहा. तुमच्याकडे आहेत का शेअर?

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : शेअर बाजाराने (Stock Market record high) आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे. या आठवड्यातल्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी (24 सप्टेंबर) मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक अर्थात सेन्सेक्स (Sensex leaps 10k) 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. हा बेंचमार्क इंडेक्स (Benchmark Index) या वर्षीच्या जानेवारीत 50 हजार अंकांवर होता. तिथपासून तो आतापर्यंतच्या सर्वांत वेगाने वाढून 60 हजार अंकांवर आला आहे. निफ्टी 50 देखील (Nifty 50) टेक स्टॉक्सच्या (Tech Stocks) हातभारामुळे 18 हजार अंकांच्या जवळ येऊन पोहोचला आहे. मुंबई शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन गुरुवारी (23 सप्टेंबर) 261.73 लाख कोटी रुपयांसह आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं होतं. मार्केट कॅपिटलायझेशन (Market Capitalization) 2001-02 साली सुमारे सहा लाख कोटी रुपयांपेक्षा थोडं अधिक होतं. 2010-11मध्ये ते 68 लाख 39 हजार 83 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. आता ते 2 कोटी 61 लाख 73 हजार 374 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची संपत्ती चांगलीच वाढली आहे. शेअर बाजाराच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की कोविड काळात सेन्सेक्सने हा टप्पा गाठणं चक्रावून टाकणारं आहे. तेजी करणाऱ्यांचं बाजारावर नियंत्रण असून, त्यांच्यासाठी हा चांगला संकेत आहे. यासोबतच गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगण्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. शेअर बाजाराचं व्हॅल्युएशन खूपच जास्त वाढलं आहे. अन्य इमर्जिंग मार्केट्सच्या तुलनेत हे जवळपास 80 टक्क्यांच्या प्रीमिअमवर आहे. बाजार याच पातळीवर राहणं कठीण आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

चर्चेत असलेल्या 'फ्रेशवर्क्स'नं 500 कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश, कोण आहे कंपनीचा संस्थापक; वाचा सविस्तर

 शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक या वर्षात 50 हजार अंकांवरून 60 हजार अंकांपर्यंत पोहोचला आहे. या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही बरीच वाढ पाहायला मिळाली आहे. टॉप पाचमध्ये दोन वित्तपुरवठा संस्था, एक स्टील कंपनी, एक सरकारी बँक आणि एक माहिती तंत्रज्ञान कंपनी यांचा समावेश आहे. असं असलं तरीही सेन्सेक्स 50 हजार अंकांवरून 20 टक्के वाढला, त्यात सर्वांत मोठं योगदान इन्फोसिस (30 टक्के वाढ), रिलायन्स इंडस्ट्रीज (19 टक्के वाढ) आणि आयसीआयसीआय बँक (30 टक्के वाढ) यांचं आहे.
कमाई करून देणाऱ्या शेअर्सची यादी (Multibagger Stocks) सेन्सेक्स 50,000 वरून 60,000 पर्यंत वाढताना या पाच कंपन्यांनी दिला मोठा फायदा 1. Bajaj Finserv Ltd. च्या शेअरमध्ये आतापर्यंत 105% तेजी 2. Tata Steel Ltd. च्या शेअरमध्ये आतापर्यंत 98% वाढ 3. Bajaj Finance Ltd. च्या शेअरमध्ये आतापर्यंत 54% वाढ 4. State Bank Of India (SBI Stock) च्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत 53% वाढ 5. Tech Mahindra Ltd. च्या शेअरमध्ये आतापर्यंत 52 वाढ. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करायची आहे?, हे आहेत सर्वात टॉपचे Apps याच प्रकारे Titan Company Ltd. च्या शेअरमध्ये 39%, Ultratech Cement Ltd. च्या शेअरमध्ये 37%, HCL Technologies Ltd. च्या शेअरमध्ये 34% आणि Sun Pharma, तसंच NTPC Ltd. च्या शेअरमध्ये क्रमश: 32% आणि 31% वाढ पाहायला मिळाली आहे.
First published:

Tags: Sensex, Share market

पुढील बातम्या