जाहिरात
मराठी बातम्या / मनी / शेअर बाजारात उसळी; Sensex 454 अंकांनी वाढला, तर Nifty 17500 पार

शेअर बाजारात उसळी; Sensex 454 अंकांनी वाढला, तर Nifty 17500 पार

शेअर बाजारात उसळी; Sensex 454 अंकांनी वाढला, तर Nifty 17500 पार

आज सेन्सेक्स 454.10 अंकांच्या किंवा 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 58,795.09 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 121.20 अंकांच्या किंवा 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 17,536.25 वर बंद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 नोव्हेंबर : वीकली एक्सपायरीच्या (Weekly Expiry) दिवशी शेअर बाजार पॉझिटिव्ह दिसला. आज सेन्सेक्स- निफ्टी (Sensex-Nifty) 0.50 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. व्यापक बाजारपेठेतही मजबूती दिसून आली. BSE मिडकॅप निर्देशांक (Micap Index) आज 0.69 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, स्मॉलकॅप निर्देशांक 0.87 टक्क्यांच्या मजबूतीसह बंद झाला. आजच्या ट्रेडमध्ये बीएसई Healthcare, oil & gas आणि realty शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) गॅसिफिकेशन उपक्रम पूर्ण मालकीच्या उपकंपनीकडे (WOS) हस्तांतरित करण्याची घोषणा केली, त्यानंतर कंपनीच्या समभागात 6 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आणि हा शेअर आज निफ्टीच्या Top Gainers मध्ये होता. खासगी Cryptocurrencies म्हणजे काय? सार्वजनिक क्रिप्टोपेक्षा त्या वेगळ्या कशा आज ट्रेडच्या शेवटी, सेन्सेक्स 454.10 अंकांच्या किंवा 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 58,795.09 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 121.20 अंकांच्या किंवा 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 17,536.25 वर बंद झाला. Go Fashion IPO: तुमच्या खात्यात पैसे येणार की शेअर्स ते अशाप्रकारे तपासा आजचे टॉप गेनर आणि टॉप लूजर शेअर Reliance Industries, Divis Labs, Infosys, ITC आणि Tech Mahindra हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. दुसरीकडे, Britannia Industries, IOC, IndusInd Bank, Maruti Suzuki आणि ICICI Bank हे निफ्टीचे Top Looser शेअर ठरले. Go Fashion IPO चे आज अलॉटमेंट गो फॅशन या महिलांसाठी बॉटम वेअर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सचे वाटप आज होणार आहे. कंपनीचा इश्यू 135.46 पट सबस्क्राइब झाला. कंपनीने 1013.6 कोटी रुपयांचा IPO जारी केला होता. गो फॅशन ही महिलांच्या बॉटम वेअर ब्रँड गो कलर्सची ऑपरेटर कंपनी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात