मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Go Fashion IPO: तुमच्या खात्यात पैसे येणार की शेअर्स ते अशाप्रकारे तपासा, आज होणार अलॉटमेंट

Go Fashion IPO: तुमच्या खात्यात पैसे येणार की शेअर्स ते अशाप्रकारे तपासा, आज होणार अलॉटमेंट

तुम्हीही गो फॅशन आयपीओसाठी गुंतवणूक (Go Fashion IPO) केली असेल तर अलॉटमेंटबाबत (Go Fashion IPO Allotment) एक आनंदाची बातमी आहे. आज तुम्ही तुमच्या शेअर्सची स्थिती तपासू शकता की तुमच्या खात्यात पैसे रिफंड झाले आहेत की तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: तुम्हीही गो फॅशन आयपीओसाठी गुंतवणूक (Go Fashion IPO) केली असेल तर अलॉटमेंटबाबत (Go Fashion IPO Allotment) एक आनंदाची बातमी आहे. आज तुम्ही तुमच्या शेअर्सची स्थिती तपासू शकता की तुमच्या खात्यात पैसे रिफंड झाले आहेत की तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत. गुंतवणूकदार बीएसईची वेबसाइट bseindia.com द्वारे शेअर्सची अलॉटमेंट तपासू शकतात. गो फॅशन ही महिलांच्या बॉटम वेअर ब्रँड गो कलर्सची ऑपरेटर कंपनी आहे. 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान इश्यू करण्यात आलेल्या गो फॅशनचा आयपीओ 135.46 पट सब्सक्राइब झाला होता.

BSE WEBSITE bseindia.com च्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या

-यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा

-त्यानंतर Issue Name (Go Fashion IPO)  निवडा

-याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक किंवा PAN प्रविष्ट करा

-यानंतर सर्च बटनवर क्लिक करा

-सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल

हे वाचा-स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स

रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी तुम्हाला या kosmic.kfintech.com/ipostatus/ लिंकवर भेट द्यावी लागेल

-यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा

-यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा

-तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा

-यानंतर Captcha सबमिट करा

-याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल

-तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल

हे वाचा-पेट्रोल-डिझेलमुळे आजही सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे लेटेस्ट दर

अशाप्रकारे मिळेल रिफंड

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळालेले नाहीत त्यांचे पैसे खात्यात जमा केले जातील. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यांना शेअर्स मिळालेले नाहीत, त्यांना परतावा देणे सुरू होईल. हा रिटर्नचा पैसा त्याच खात्यात येईल ज्याद्वारे तुम्ही गुंतवणूक केली आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल त्यांच्या डीमॅट खात्यातील शेअर्स 29 नोव्हेंबर रोजी जमा केले जातील.

First published:

Tags: Money