• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Share Market : शेअर बाजारात आज घसरण; उद्या कशी असेल बाजाराची दिशा?

Share Market : शेअर बाजारात आज घसरण; उद्या कशी असेल बाजाराची दिशा?

सेन्सेक्स आज 112.16 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 60,433.45 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.20 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांनी घसरुन 18,044.30 वर बंद झाला.

 • Share this:
  मुंबई, 9 नोव्हेंबर : दोन दिवसांच्या वाढीनंतर, कमजोर ग्लोबल मार्केट (Global Market) संकेतांमुळे बाजारात आज प्रॉफिट बुकिंग झालं. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex and Nifty) लाल चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स आज 112.16 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 60,433.45 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.20 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांनी घसरुन 18,044.30 वर बंद झाला. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर सांगतात की, पॉझिटिव्ह ओपनिंगनंतर आज देशांतर्गत बाजारात दबाव दिसून आला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग समभाग घसरले. मात्र, बाजाराच्या ट्रेंडविरोधात Auto, Public Sector Banks, Consumer Durables  मध्ये वाढ झाली आहे. एवढेच नाही तर मोठ्या शेअर्सच्या तुलनेत लहान आणि मध्यम शेअर्सची कामगिरी चांगली राहिली आहे. ते पुढे म्हणाले की बहुप्रतिक्षित इन्फ्रास्ट्रक्चर विधेयक मंजूर होऊनही, यूएस बाजार सावधगिरीने ट्रेड करत असल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे इथे सगळ्यांच्या नजरा अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर खिळल्या आहेत. Bitcoin Price Today: बिटकॉइन 68 हजार डॉलरच्या पार, ऑल टाइम हायवर आहे ही Cryptocurrency टेक्निकल व्ह्यू निफ्टीने आज डेली स्केलवर एक लहान बियरिश कँडल तयार केली आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनपासून निफ्टी हायर लेव्हलवर आहे. मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया सांगतात की, आता निफ्टीला 18000 च्या वरच राहावे लागेल तरच निफ्टी 18150 आणि 18350 च्या झोनमध्ये जाईल. डाउनसाईडवर, निफ्टीला 17850-17777 च्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. दीनदयाल इन्व्हेस्टमेंटचे मनीष हथीरामानी म्हणतात की निफ्टी आज 18,000 च्या वर बंद झाला आहे, हे एक सकारात्मक लक्षण आहे. मात्र निफ्टीची दिशा अद्याप स्पष्ट नसून हाय लेव्हलवर याला रजिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. जर निफ्टी या लेव्हलवर राहिला तर तो आपल्याला 18400-18600 च्या दिशेने जाताना दिसेल. 17600 वर निफ्टीला चांगला सपोर्ट आहे. Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी! LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणतात की 18,000 लेव्हलवर निफ्टीला मजबूत सपोर्ट आहे. जर निफ्टी वर राहिला तर तो 18,200-18,300 च्या दिशेने जाताना दिसेल. बाजाराचा ओव्हर ऑल स्ट्रक्चर अजून सकारात्मक आहे. त्यामुळे प्रत्येक घसरणीवर खरेदी करण्याचा सल्ला रोहित सिंगारे यांनी दिला. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Pravin Wakchoure
  First published: