मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Bitcoin Price Today: बिटकॉइन 68 हजार डॉलरच्या पार, ऑल टाइम हायवर आहे ही Cryptocurrency

Bitcoin Price Today: बिटकॉइन 68 हजार डॉलरच्या पार, ऑल टाइम हायवर आहे ही Cryptocurrency

सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असणाऱ्या बिटकॉइनच्या किमतीने (Bitcoin Price Today) आतापर्यंतचा उच्चांक (Bitcoin Price on all time high) गाठला आहे. आज मंगळवारी दुपारी बिटकॉइनने $68 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असणाऱ्या बिटकॉइनच्या किमतीने (Bitcoin Price Today) आतापर्यंतचा उच्चांक (Bitcoin Price on all time high) गाठला आहे. आज मंगळवारी दुपारी बिटकॉइनने $68 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असणाऱ्या बिटकॉइनच्या किमतीने (Bitcoin Price Today) आतापर्यंतचा उच्चांक (Bitcoin Price on all time high) गाठला आहे. आज मंगळवारी दुपारी बिटकॉइनने $68 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 09 नोव्हेंबर: बँक-पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक, सोन्यातील गुंतवणूक किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणा, या प्रत्येक इनव्हेस्टमेंटची (Investment Option) गेल्या अनेक दशकांपासून चलती आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आणखी एक पर्याय गुंतवणुकीसाठी निवडला जात आहे तो म्हणजे क्रिप्टोकरन्सीमध्ये (Investment in Cryptocurrency) गुंतवणूक. हा पर्याय जोखमीचा असला तरी अनेक गुंतवणूकदार या पर्यायाकडे वळले आहेत. दरम्यान सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असणाऱ्या बिटकॉइनच्या किमतीने (Bitcoin Price Today) आतापर्यंतचा उच्चांक (Bitcoin Price on all time high) गाठला आहे. आज मंगळवारी दुपारी बिटकॉइनने $68 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेली रॅली सुरू ठेवत, बिटकॉइन 68,049 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे. बाजारातील रॅलीमुळे, क्रिप्टोकरन्सीचे बाजार भांडवल केवळ एका महिन्यात $1 ट्रिलियन वरून $3 ट्रिलियन झाले आहे.

हे वाचा-ITR Filing: फॉर्म 16 शिवायही भरू शकता आयकर रिटर्न, जाणून घ्या सविस्तर

इथेरियम

CoinGecko च्या डेटानुसार, Ether ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, $4,800 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. त्यात 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. इथरियमच्या उच्च व्यवहार शुल्कामुळे Solana आणि Polkadot सारख्या टोकनकडे लक्ष वेधले जात आहे. गेल्या 24 तासांत दोन्ही नाण्यांमध्ये अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोलाना 21 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

कार्डानो

कार्डानोनेही मंगळवारी सकाळी सुमारे 5 टक्क्यांची उसळी घेतली आहे. गेल्या 7 दिवसांत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रिपल एक्सआरपी (Ripple XRP) ने देखील गेल्या आठवड्यात 15% पेक्षा जास्त रॅलीचा आनंद लुटला आहे.

हे वाचा-Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी!

Dogecoin

मंगळवारी सकाळी Dogecoin मध्ये सुमारे 6% वाढ झाली आहे. यामुळे त्याचा साप्ताहिक नफा 6% झाला. गेल्या काही दिवसांपासून नाण्यामध्ये थोडी वाढ झाली आहे. मार्केट कॅपनुसार 11 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे नाणे शिबा इनू देखील 3 टक्क्यांनी वाढले.

भारतातील क्रिप्टोकरन्सी

भारतात क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात अद्याप मध्यम स्वरूपाचाच विचार आहे. एका सरकारी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतीयांची मोठी गुंतवणूक पाहता, क्रिप्टोवर बंदी घालण्याचा कठोर दृष्टिकोन शक्य नाही. पण या अनियंत्रित आभासी चलनांना लीगल टेंडर  म्हणूनही परवानगी दिली जाण्याची शक्यता नाही. सरकारला व्हर्च्युअल मालमत्तेवरील कायद्याला लवकरात लवकर अंतिम रूप द्यायचे आहे,  जेणेकरुन संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ते सादर केले जाऊ शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार, कायद्याच्या रुपरेखा लवकरच अंतिम केली जाईल. याबाबत लवकरच सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

First published:

Tags: Money, Savings and investments