• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • या कारणांमुळे शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

या कारणांमुळे शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

शेअर बाजारात चांगलं वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेतला पाहिजे पण फार आक्रमकपणे ट्रेंडिग करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑगस्ट : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केलेल्या घोषणांचा परिणाम सेन्सेक्सवर पाहायला मिळाला. शेअर बाजार तेजीत आल्यामुळे गुंतवणूकदारांना 2 कोटी 43 लाख रुपयांचा फायदा झाला. निर्मला सीतारामन यांनी बँकांना 70 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीही आणखी काही घोषणा केल्या. त्यामुळे शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वॉर थांबवण्यासाठी चर्चा सुरू झाल्यामुळेही सेन्सेक्समध्ये वाढ झाली. BSE चा निर्देशांक 37,494 वर बंद झाला तर निफ्टी 11,057 वर स्थिरावला. खबरदारी घेण्याची गरज शेअर मार्केट तज्ज्ञ उदयन मुखर्जी यांच्या मते, सरकारने अर्थव्यवस्थेसाठी चांगले निर्णय घेतले आहेत पण याचा अर्थव्यवस्थेर फारसा परिणाम होणार नाही. या स्थितीत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेमध्ये यामुळे बदल होणार नसला तरी लोकांमध्ये सकारात्मक भावना होऊ शकते. पी. चिदंबरम यांना दिलासा नाही, या व्यक्तीच्या जबाबामुळे असे फसले! शेअर बाजारात चांगलं वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले. पण फार आक्रमकपणे ट्रेंडिग करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांच्या मते, छोट्या गुंतवणूकदारांनाही या स्थितीचा फायदा होऊ शकतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठीही ही चांगली संधी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. ======================================================================================= VIDEO: निवडणुकीवरून भररस्त्यात मुलींमध्ये तुफान राडा
  Published by:Arti Kulkarni
  First published: