पी. चिदंबरम यांना दिलासा नाहीच, या व्यक्तीच्या जबाबामुळे असे फसले माजी अर्थमंत्री

पी. चिदंबरम यांना दिलासा नाहीच, या व्यक्तीच्या जबाबामुळे असे फसले माजी अर्थमंत्री

इंद्राणीने तिच्या जबाबात म्हटलं होतं, पीटर मुखर्जी यांनी चिदंबमरम यांच्याशी चर्चा सुरू केली आणि INX मीडिया चा परकीय गुंतवणुकीचा अर्ज चिदंबरम यांच्याकडे सोपवला. या परवानगीच्या बदल्यात पीटर मुखर्जी यांनी कार्ती चिदंबरम यांना बिझनेसमध्ये मदत करावी, असं चिदंबरम यांनी सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम INX मीडिया खटल्यात CBI च्या कोठडीत आहेत. आता सुप्रीम कोर्टानेही त्यांना दणका दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने जामीन रद्द केल्याच्या विरोधात चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. कोर्टाने मात्र त्यांचं अपील फेटाळून लावलं आहे.

'दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांना जामीन नाकारला ते योग्यच आहे. चिदंबरम आधीच CBI च्या कोठडीत आहेत. त्यामुळे चिदंबरम यांच्या या याचिकेला काही अर्थ नाही', असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

पी. चिदंबरम यांच्या CBI कोठडीची मुदत आज संपत आहे. आता त्यांना CBI च्या कोर्टात सादर केलं जाईल. या कोर्टात CBI त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतं.

पी. चिदंबरम यांच्यावर INX मीडिया खटल्यातल्या कारवाईचा फास आता आवळत चालला आहे. या खटल्यात INX मीडियाची प्रमोटर इंद्राणी मुखर्जी सरकारी साक्षीदार बनल्यामुळे चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या.

काय आहे INX मीडिया खटला ?

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 2007 मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या FIPB ने INX मीडिया ला 4 कोटी 62 लाख रुपयांच्या परकीय गुंवणुकीची मर्यादा दिली होती. पण INX मीडिया ने हे नियम धाब्यावर बसवून 305 कोटी 36 लाख रुपये परकीय गुंतवणूक मिळवली. या रकमेतून INX मीडिया कंपनीने बेकायदेशीररित्या 26 टक्के रक्कम न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. त्यासाठी त्यांनी FIPB ची परवानगीही घेतली नव्हती. CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, INX मीडिया कंपनीसाठी मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं आहे.

चिदंबरम यांचं नाव खटल्यात आलं कसं ?

2007 मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना या बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप होता. 15 मे 2017 ला CBI ने FIPB मध्ये झालेल्या अनियमततेबद्दल तक्रारही दाखल केली होती.याच वेळी या खटल्यात पहिल्यांदा पी. चिदंबरम यांचं नाव आलं.

सोन्याची चाळीशी! ऐन सणासुदीच्या काळात गाठला दराचा उच्चांक

पी. चिदंबरम यांच्याविरोधात तपास सुरूच राहिला. वेळोवेळी छापेही घातले गेले पण ठोस पुरावा मिळत नव्हता. कायदे मंत्रालयाने 3 फेब्रुवारी 2018 ला चिदंबरम यांचा तपास करण्याचे आदेश दिले. ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने कार्ती चिदंबरम यांच्या तपासाचे आदेश दिले. त्यांच्यावर छापे घातले आणि 54 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FIPB कडून परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळवण्याबद्दल INX मीडिया चे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. इंद्राणी मुखर्जीने हे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम आहेत, असं CBI ला सांगितलं.

इंद्राणीच्या जबाबानंतर चिदंबरम यांना अटक

इंद्राणीने तिच्या जबाबात म्हटलं होतं, पीटर मुखर्जी यांनी चिदंबमरम यांच्याशी चर्चा सुरू केली आणि INX मीडिया चा परकीय गुंतवणुकीचा अर्ज चिदंबरम यांच्याकडे सोपवला. या परवानगीच्या बदल्यात पीटर मुखर्जी यांनी कार्ती चिदंबरम यांना मदत करावी, असं चिदंबरम यांनी सांगितलं. इंद्राणी मुखर्जीचा हा जबाब ईडी ने आरोपपत्रात लिहिला आहे आणि कोर्टासमोरही तो पुरावा म्हणून सादर करण्यात आला. कार्ती चिदंबरम यांची संपत्ती INX मीडिया प्रकरणी मिळालेल्या लाचेच्या रकमेतून खरेदी करण्यात आली, असा आरोप आहे.

VIDEO: 'विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्यानं भाजपच्या नेत्यांचा मृत्यू'

=================================================================================================

VIDEO: मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 03:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading