जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stocks: 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई, तुमच्याकडे आहेत का?

Multibagger Stocks: 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई, तुमच्याकडे आहेत का?

Multibagger Stocks: 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई, तुमच्याकडे आहेत का?

आज असेच पाच स्टॉक सांगत आहोत, ज्यांनी गेल्या एका महिन्यात त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला नफा दिला आहे. हे असे शेअर आहेत जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि बाजार विश्लेषकांना असा विश्वास आहे की ते भविष्यातही चांगली कमाई करतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 फेब्रुवारी : एक मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) कमी वेळेत तुम्हाला मालामाल करु शकतो. त्यामुळेच शेअर बाजारातील गुंतवणूकदार सतत मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधात असतात. 2022 मध्ये, काही स्मॉल कॅप स्टॉक मल्टीबॅगर्सच्या यादीत सामील झाले आहेत. मल्टीबॅगर दर्जा प्राप्त करणार्‍या शेअर्सची संख्या मोठी आहे. हे शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा देत आहेत. आम्ही आज असेच पाच स्टॉक सांगत आहोत, ज्यांनी गेल्या एका महिन्यात त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला नफा दिला आहे. हे असे शेअर आहेत जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि बाजार विश्लेषकांना असा विश्वास आहे की ते भविष्यातही चांगली कमाई करतील. मॅगेलॅनिक क्लाउडने 165 टक्के परतावा दिला मॅगेलॅनिक क्लाउडचे (Magellanic Cloud) शेअर एका महिन्यात सुमारे 165 टक्क्यांनी वाढला आहे. महिनाभरापूर्वी तो 87.30 रुपये होता, तो आता 231 रुपये झाला आहे. या शेअरचे बाजार भांडवल (Market Cap) सुमारे 581 कोटी रुपये आहे आणि त्याचे P/E रेश्यो 17.34 आहे. शुक्रवारच्या व्यवहारात या शेअरने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 37.25 रुपये आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेअरने ही पातळी गाठली होती. IPO मध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? मग ‘या’ गोष्टींची माहिती हवीच! सेजल ग्लास शेअरमुळे गुंतवणूकदारांचा फायदा सेझल ग्लासच्या (Sezal Glass) स्टॉकनेही एका महिन्यात सुमारे 162 टक्के परतावा दिला आहे. शेअर 29.45 रुपयांवरून 77.35 रुपयांवर गेला आहे. त्याचे सध्याचे बाजार भांडवल 77.35 लाख रुपये आहे. NSE वर ते 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. तर त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 13 रुपये आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही पातळी गाठली होती. गेल्या दीड महिन्याबद्दल बोलायचे झाले तर या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना 390 टक्के परतावा दिला आहे. टाईन अॅग्रोची जोरदार वाढ टाईन अॅग्रो शेअर्स (Tine Agro Share) या एक्स ग्रुप स्मॉल कॅप मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये एका महिन्यात 8.25 रुपये प्रति शेअरवरून 21.60 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. शेअरने सुमारे 162 टक्के परतावा दिला आहे. सध्या हा पेनी स्टॉक बीएसईवर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. Tine Agro स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 3.90 रुपये आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड यूजर्सना झटका, 10 फेब्रुवारीपासून अनेक चार्जेस वाढणार मैत्री एंटरप्रायझेस शेअरमध्ये 161 टक्क्यांची वाढ मैत्री एंटरप्रायझेसचा शेअरही (Maitri Enterprises share) एका महिन्यात 161 टक्क्यांनी वाढला आहे. तो 22.70 रुपयांवरून 59.30 रुपये वर गेला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 26 कोटी रुपये आहे. मैत्री एंटरप्रायझेसचा शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. या स्टॉकला पेनी स्टॉकमधून लो लिक्विडिटी स्मॉल कॅप स्टॉक होण्यासाठी फक्त एक वर्ष लागले आहे. त्याचे प्रति शेअर बूक वॅल्यू 10.78 रुपये आहे. एआरसी फायनान्सचा मल्टीबॅगर परतावा एआरसी फायनान्सच्या स्टॉकनेही (ARC Finance) एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के परतावा दिला आहे. महिन्यापूर्वी या शेअरची किंमत 13.11 रुपये होती, जी आता 34.15 रुपये झाली आहे. सुमारे 172 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह हा लो लिक्विडिटी असलेला स्टॉक आहे. शुक्रवारी बीएसईवर त्याने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात