जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IPO मध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? मग 'या' गोष्टींची माहिती हवीच!

IPO मध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? मग 'या' गोष्टींची माहिती हवीच!

IPO मध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? मग 'या' गोष्टींची माहिती हवीच!

आतापर्यंत 30हून अधिक आयपीओ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (SEBI) मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही कंपन्या निरीक्षणाखाली आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 7 फेब्रुवारी :  गेल्या वर्षभरात भारतामध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) करणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे त्याला गुंतवणूकदारांचा (investors) अभूतपूर्व प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या वर्षभरात भरभराट आणि विक्रमी गुंतवणूक पाहिलेल्या दलाल स्ट्रीटवर (Dalal Street) सध्या डझनभर स्टार्टअप्स (startups) आणि कंपन्या (companies) आयपीओ लिस्टिंगसाठी सज्ज आहेत. आतापर्यंत 30हून अधिक आयपीओ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (SEBI) मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही कंपन्या निरीक्षणाखाली आहेत. एलआयसी (LIC) आयपीओ हा भारतातला आजपर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ म्हणून ओळखला जातो. लवकरच तोदेखील लिस्टिंगसाठी येणार असल्याचं सरकारनं सूचित केलं आहे. ज्या प्रमाणात कंपन्या आयपीओ आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तितक्याच प्रमाणात नवीन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यात स्वारस्य निर्माण होत आहे; पण गुंतवणूक करताना काळजीपूर्वक केली पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी या वर्षी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवा पार्श्वभूमी तपासा : कोणत्याही प्रकारच्या स्टॉकमध्ये (stock), विशेषतः आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची सविस्तर माहिती मिळवणं सर्वांत जास्त गरजेचं आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा आर्थिक इतिहास (financial history) तपासला पाहिजे. कंपनीचं ग्रोथ पोटेन्शियल (growth potential) समजून घेतलं पाहिजे. यामुळे संबंधित कंपनी आयपीओ का आणत आहे, याची तुम्हाला कल्पना येईल. गुंतवणूक करताना तुम्हाला बॅकग्राउंड चेकची (Background Check) नक्कीच मदत होईल. ICICI बँक क्रेडिट कार्ड यूजर्सना झटका, 10 फेब्रुवारीपासून अनेक चार्जेस वाढणार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस वाचा : पब्लिक ऑफर आणण्यापूर्वी ‘सेबी’कडे ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (DHRP) सादर करणं कंपन्यांना बंधनकारक केलेलं आहे. कंपनी आयपीओमधून मिळणारं उत्पन्न कशा प्रकारे वापरण्याचा विचार करत आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारची रिस्क (risks) असू शकते, याचे तपशील या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेले असतात. पैसे कसे वापरले जातात : आयपीओमधून मिळालेले पैसे पूर्णपणे कंपनीचं कर्ज फेडण्यासाठी वापरले जात असतील, तर त्यात गुंतवणूक करणं योग्य नाही; पण कंपनीने आयपीओमधून मिळालेल्या फंडचा काही भाग जनरल कॉर्पोरेट हेतूंसाठी (general corporate purposes) वापरला, तर गुंतवणूकदारांना वाढीची खात्री दिली जाऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी पैसे कशा प्रकारे वापरणार आहे, याची माहिती नक्की घेतली पाहिजे. कंपनीचं व्हॅल्युएशन तपासा : तुम्ही निवडलेल्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, कंपनीचं व्हॅल्युएशन (Valuation) तपासणं आवश्यक आहे. इंडस्ट्री पॅरामीटर्सचा (industry parameters) विचार केल्यास, कंपनीची ऑफर प्राइस अंडरव्हॅल्यूड (खूप कमी), ओव्हर व्हॅल्यूड (खूप जास्त) किंवा राइटली व्हॅल्यूड (योग्य) असू शकते. त्यामुळे संबंधित कंपनीची गेल्या काही वर्षांतली आर्थिक कामगिरी (financial performance) तपासणं गरजेचं ठरतं. कंपनीची कामगिरी चांगली असल्यास तिच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. LIC IPO : तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर स्वस्तात मिळणार शेअर गुंतवणूकदारांचे हेतू : एक गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला आयपीओमधून काय अपेक्षित आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. शेअर्स जास्त काळ टिकवून ठेवण्यापेक्षा जलद नफा मिळवण्याकडे तुमचा कल असेल, तर तुम्ही बाजारभावानुसार (market sentiments) आयपीओ निवडावा. तुम्ही दीर्घकालीन नफ्याचा (long-term profit) विचार करूनही योग्य आयपीओ निवडू शकता; मात्र ही गोष्ट कंपनीच्या धोरणांवर अवलंबून असेल. एखादी ऑफर खूप प्रसिद्ध झाली आहे म्हणून त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असा विचार करू नये. एकूणच तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर वरच्या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात