मुंबई, 6 फेब्रुवारी : तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ICICI बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित सेवा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सांगितले की 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्ड लेट पेमेंट फी (Credit Card Late Payment Fees), कॅश अॅडव्हान्स ट्रान्झॅक्शन फी, चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेने एमराल्ड क्रेडिट कार्ड (ICICI Bank Emerald Credit Card) व्यतिरिक्त इतर क्रेडिट कार्डचे लेट पेमेंट शुल्क बदलले आहे. जर तुमची एकूण थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी असेल, तर बँक तुमच्याकडून काहीही आकारणार नाही. थकबाकी जितकी जास्त असेल तितके शुल्क जास्त असेल. 50,000 किंवा त्याहून अधिक थकबाकीसाठी, बँक जास्तीत जास्त 1200 रुपये आकारेल. बँकेचे नवीन दर 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील. Saving Account वर मिळतंय 7 टक्क्यांपर्यंत व्याज, कोणत्या बँकांमध्ये किती व्याजदर; चेक करा याशिवाय, 10 फेब्रुवारी 2022 पासून, ICICI बँक क्रेडिट कार्डमधून कॅश अॅडव्हान्स रक्कम घेतल्यास, ट्रान्जॅक्शन फीस अॅडव्हान्स अमाऊंटवर 2.50 टक्के असेल, जे किमान 500 रुपये असेल. चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फी एकूण देय रकमेच्या 2 टक्के असेल, जी किमान 500 रुपये असेल. Multibagger Stock : ‘या’’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट, Rakesh Jhunjhunwal यांच्या पोर्टफोलिओत समावेश याशिवाय, आयसीआयसीआय बँकेचे म्हणणे आहे की चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फीच्या बाबतीत, 50 रुपये आणि जीएसटी देखील ग्राहकाच्या बचत खात्यातून स्वतंत्रपणे कापला जाईल. तुम्हाला सुधारित फी स्ट्रक्चरबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, https://www.icicibank.com/managed-assets/docs/personal/F-nd-C-TnC-Dec-21-Revised-Charges.pdf वेबसाईटवर जाऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.