नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: जगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जेफ बेझोस (Jeff Bazos Latest News) यांच्यासमोर एक महत्त्वाची समस्या उभी राहिली आहे. त्यांच्या कंपनीतील 21 कर्मचाऱ्यांनी बेझोस यांच्यावर आणि कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीकडून दुसऱ्या अंतराळ मोहीमेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याआधीच कर्मचाऱ्यांच्या गंभीर आरोपांमुळे जेफ बेझोस अडचणीत आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते ब्लू ओरिजिनमधील वातावरण अत्यंत खराब झालं आहे.
बेझोस (Jeff Bazos Net Worth) स्पेसएक्सचे मालक एलन मस्क (Elon Musk Net Worth) आणि व्हर्जिन गॅलेक्टिकचे संस्थापक रिचर्ड ब्रेन्सन यांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करत आहेत. यामुळे, ते कर्मचाऱ्यांना नाही तर केवळ कंपनीला प्राधान्य देतात. यामुळे कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे. कंपनीच्या माजी कर्मचारी संपर्क प्रमुख अलेक्झांड्रा यांनीही हा मुद्दा ठळकपणे मांडला. त्या म्हणाल्या की- 'स्पेस कंपनीमध्ये पुरुषांना प्राधान्य दिले जाते. याठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत. महिला कर्मचारी दिवसागणिक लैंगिक छळाच्या शिकार बनत आहेत. महिलांना ‘बेबी गर्ल’, ‘बेबी डॉल’ किंवा ‘स्वीटहार्ट’ अशी हाक मारली जाते. कंपनीचे मोठे अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक वेळविषयी विचारत राहतात.'
वाचा-कोरोनानंतर आता चीनने आणलं जगावर आणखी एक मोठं संकट; संपूर्ण जगावर मंदीचं सावट!
असा देखील आरोप केला जात आहे की जेफ बेझोस यांच्या कंपनीमध्ये महिलांचे मत देखील विचारात घेतले जात नाही. अलेक्झांड्रा यांनी सांगितले की ब्लू ओरिजिनच्या एका अधिकाऱ्याने नासाच्या माजी अंतराळवीरांना सांगितले की तुम्ही स्त्रियांऐवजी माझा सल्ला घ्या, कारण मी एक पुरुष आहे आणि महिलांपेक्षा चांगले मत देऊ शकतो.
वाचा-सप्टेंबर महिन्यात 4%ने उतरलं सोनं, फेस्टिव्ह सीझनआधी खरेदीची आहे सुवर्णसंधी?
दरम्यान ब्लू ओरिजिनच्या प्रवक्त्याने हे आरोप नाकारले आहेत. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'अलेक्झांड्राना दोन वर्षांपूर्वी कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. ब्लू ओरिजिनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध भेदभाव किंवा छळाची अशी कोणतीही घटना नाही. हे सर्व टाळण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना हॉटलाइनची सुविधा दिली आहे. ही हॉटलाइन 24 तास सुरू असते. तक्रार प्राप्त होताच कंपनी कारवाई देखील करते.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elon musk