मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price: सप्टेंबर महिन्यात 4%ने कमी झाले सोन्याचे भाव, फेस्टिव्ह सीझनआधी खरेदीची आहे सुवर्णसंधी?

Gold Price: सप्टेंबर महिन्यात 4%ने कमी झाले सोन्याचे भाव, फेस्टिव्ह सीझनआधी खरेदीची आहे सुवर्णसंधी?

सप्टेंबरमध्ये MCX वर सोन्याचे भाव (Gold Rate dips by 4% in September 2021) सुमारे 4% नी कमी झाले, तर ऑगस्टमध्ये हे दर 2.1% नी कमी झाले होते.

सप्टेंबरमध्ये MCX वर सोन्याचे भाव (Gold Rate dips by 4% in September 2021) सुमारे 4% नी कमी झाले, तर ऑगस्टमध्ये हे दर 2.1% नी कमी झाले होते.

सप्टेंबरमध्ये MCX वर सोन्याचे भाव (Gold Rate dips by 4% in September 2021) सुमारे 4% नी कमी झाले, तर ऑगस्टमध्ये हे दर 2.1% नी कमी झाले होते.

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Price Today on MCX) वर सोन्याचे भाव शुक्रवारी 0.05 टक्क्यांनी घसरले आहेत. शुक्रवारी MCX वर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर (Gold Rate Today) 46,000 रुपये प्रति तोळा होते. गुरुवारच्या किंमतीच्या तुलनेत 21 रुपयांनी हे दर कमी आहेत. सप्टेंबरमध्ये MCX वर सोन्याचे भाव (Gold Rate dips by 4% in September 2021) सुमारे 4% नी कमी झाले, तर ऑगस्टमध्ये हे दर 2.1% नी कमी झाले होते.

सोन्याच्या किंमतीवर दबाव

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, दरम्यान IIFL सिक्योरिटीजमधील कमोडिटी अँड करन्सी ट्रेडचे वाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर जोपर्यंत 1750 डॉलर प्रति औंसपेक्षा कमी आहेत तोपर्यंत सोन्याच्या किमतीवर दबाव कायम राहील. त्यांनी अशी माहिती दिली की, या मौल्यवान धातूला $1680 च्या किंमतीच्या स्तरावर भक्कम आधार आहे. अशा परिस्थितीत, सोन्याच्या किंमतीत झालेली कोणतीही मोठी घसरण गुंतवणूकदार खरेदीची संधी म्हणून पाहू शकतात.

लोन घेण्यासाठी आवश्यक दस्तावेज, पगारधारक किंवा सेल्‍फ एम्‍प्‍लॉइडसाठी महत्त्वाचे

गोल्ड कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव कायम राहू शकतो. मात्र कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक महागाईत मोठी वाढ होऊ शकते. महागाईतील या तेजीमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हला बाँड खरेदीबाबत विचार न करण्याच्या अलीकडील निर्णयावर पुनर्विचार करण्यास भाग पाडले जाऊ शकते.

अशावेळी कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सोन्यातील घसरणीची स्थिती बंद होऊ शकते. शिवाय भारतात काहीच दिवसात फेस्टिव्ह सीझन सुरू होत आहे. त्यामुळ सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याासाठी हा पॉझिटिव्ह आउटलुक आहे. त्यांनी अशी माहिती दिली की चीनमध्ये आलेल्या वीज संकटामुळे बाजारात मोठी घसरण होऊ शकते. अशावेळी इक्विटी गुंतवणूकदार सोन्याच्या पर्यायाकडे वळू शकतात.

या तारखेला बँक ऑफ बडोदा विकतेय स्वस्त प्रॉपर्टी, खरेदी करा तुमचं स्वत:चं घर

काय राहतील सोन्याचे दर?

ऑक्टोबरमध्ये सोन्याचे दर वाढतील का? या प्रश्नावर एका गोल्ड कमोडिटी तज्ज्ञाने असे उत्तर दिले की, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात एमसीएक्सवर सोन्याचे दर ₹45,500 वरून ₹45,000 प्रति तोळापर्यंत घसरू शकतात कारण या काळात अमरिकेत डॉलर मजबूत स्तरावर राहील. मात्र जेव्हा डॉलरमध्ये कमजोरी येण्यास सुरूवात होईल तेव्हा, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1750 डॉलर ते 1760 डॉलर प्रति औंसच्या पलीकडे पोहोचतील आणि दर पुढील एका महिन्यात 1800 डॉलर ते 1850 डॉलर प्रति औंसपर्यत पोहोचतील. MCX वर सोन्याचे दर पुढील एका महिन्यात ₹48,000 ते ₹48,500 प्रति तोळापर्यत जाऊ शकतात.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today