मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कोरोनानंतर आता चीनने आणलं जगावर आणखी एक मोठं संकट; संपूर्ण जगावर मंदीचं सावट!

कोरोनानंतर आता चीनने आणलं जगावर आणखी एक मोठं संकट; संपूर्ण जगावर मंदीचं सावट!

 Evergrande बंद झाली, तर त्याचा थेट परिणाम देशातल्या कित्येक कंपन्यांवर होणार आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येण्याची शक्यता आहे.

Evergrande बंद झाली, तर त्याचा थेट परिणाम देशातल्या कित्येक कंपन्यांवर होणार आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येण्याची शक्यता आहे.

Evergrande बंद झाली, तर त्याचा थेट परिणाम देशातल्या कित्येक कंपन्यांवर होणार आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येण्याची शक्यता आहे.

  मुंबई, 01 ऑक्टोबर : आधीच जगभरात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग बंद आहेत. दीड वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर आता तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली जगभरातले देश 'अनलॉक' होत आहेत. यातच आता चीनमुळे जगाला आर्थिक महामंदीचा (China Economic crisis) तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  ब्लूमबर्ग इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी जगातल्या ज्या दहा अब्जाधीशांची संपत्ती कमी झाली आहे, त्यांच्यापैकी सहा चीनचे आहेत. यासोबतच, चीनमधलं प्रॉपर्टी मार्केट (China property market crisis) अत्यंत डबघाईला आलं आहे. जगातली सर्वांत जास्त लोकसंख्या असणाऱ्या आणि दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनवर ही वेळ कशामुळे आली? याचा जगावर आणि भारतावर काय परिणाम होईल, असं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.

  चीनवर ही वेळ कशामुळे आली याचं उत्तर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) घेत असलेल्या निर्णयांमध्ये आहे. शिक्षण क्षेत्रापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध निर्णय ते घेत आहेत. देशातल्या गरीब-श्रीमंतांमधलं अंतर कमी करण्याच्या दृष्टीने ते काम करत आहेत. यामुळेच चीन सध्या देशातल्या खासगी कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात बंधनं (China restrictions on Private sector) घालत आहे. यामुळेच विविध उद्योगांमध्ये पैसे गुंतवलेल्या अब्जाधीशांना मोठा फटका बसत आहे. विशेषतः इंटरनेटशी संबंधित कंपन्यांवर निर्बंध लागू केल्यापासून चीनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये भूकंप झाला. यामुळे जगभरातल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  चिनी सरकारच्या निर्णयांमुळे देशातल्या सहा मोठ्या अब्जाधीशांना फटका बसला आहे. यात सर्वांत वर नाव आहे चिनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या पिनडुओडुओ इनकॉर्पोरेटेडचे (Pinduoduo Inc) संस्थापक कॉलिन हुआंग यांचं. या वर्षी जगात सर्वांत जास्त नुकसान या व्यक्तीचं झालं आहे. त्यांच्या कंपनीला या वर्षी तब्बल 27 बिलियन डॉलर्सहून अधिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीची शेअर व्हॅल्यू कोसळल्यामुळे हे नुकसान झाल्याचं ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

  ‘महिलांबाबत शब्द जपून वापरा’; कबीर सिंगच्या VIDEO वरून मुंबई पोलिसांचा दम

  चीनमधली सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले झोंग शानशान या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काही महिन्यांपूर्वीच ते आशियातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती (Asia’s richest man) म्हणून ओळखले जात होते; मात्र या वर्षी त्यांच्या संपत्तीत सुमारे 16 बिलियन डॉलर्सची घट झाली. अर्थात, तरीही ते जगातल्या 19व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. या यादीमध्ये पुढे चीनमधली दुसऱ्या क्रमांकाची रिअल इस्टेट कंपनी असलेल्या एव्हरग्रँड ग्रुपचा (Evergrande group crisis) समावेश आहे. या ग्रुपचे अध्यक्ष हुई-का-यान यांच्यावर सुमारे 304 अब्ज डॉलरचं कर्ज आहे. ही बाब बऱ्याच काळापासून लपवून ठेवण्यात आली होती. आता याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोक कंपनीत पैसे गुंतवण्यास टाळाटाळ करत आहेत. कित्येकांनी तर वेळेत घरं पूर्ण करून दिली नाहीत म्हणून कंपनीवर दावेही ठोकले आहेत.

  बाकी कोणापेक्षाही एव्हरग्रँडचं प्रकरण जास्त गंभीर आहे. कारण, या कंपनीचं दिवाळं निघाल्यास देशाच्या रिअल इस्टेट बिझनेसला (China real estate business) मोठा फटका बसू शकतो. याचा थेट परिणाम इतर विविध सेक्टर्सवर होणार आहे. शिवाय, या कंपनीमध्ये जगभरातल्या मोठमोठ्या लोकांनी पैसे गुंतवले (Investors of Evergrande) आहेत, ज्यांमध्ये टेक जायंट इलॉन मस्क, अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस, वॉरेन बफे, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग अशा व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे एव्हरग्रँड बुडाली, तर या सर्वांचे पैसे बुडणार आहेत आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे.

  वरतून बरसतोय पाऊस आणि जमिनीतून आला मोठा आवाज, बीडमध्ये उडाली खळबळ

  दरम्यान, भारतातल्या स्टील, केमिकल्स आणि मेटल सेक्टरमधला निर्यात होणारा बराचसा माल एव्हरग्रँडच्या माध्यमातून चीनमध्ये विकला जातो. त्यामुळे एव्हरग्रँड (Evergrande crisis effect on India) बंद झाली, तर त्याचा थेट परिणाम देशातल्या कित्येक कंपन्यांवर होणार आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येण्याची शक्यता आहे.

  First published: