मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आजपासून मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोनं, वाचा कशी कराल गुंतवणूक

आजपासून मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोनं, वाचा कशी कराल गुंतवणूक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 मे : मोदी सरकारकडून (Modi Government) स्वस्त सोनं खरेदी करण्याची दुसरी संधी आजपासून पुन्हा एकदा तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.  सॉव्हरेन गोल्ड बाँड 20 एप्रिल ते 2 सप्टेंबरपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येणार आहेत. 20 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान हे गोल्ड बाँड खरेदी करण्याचा पहिला टप्पा पार पडला. आता 11 मे ते 15 मेपर्यंत असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वस्त सोनेखरेदी करता येणार आहे.  याकरता प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 4,590 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतून तुम्हाला प्रति तोळा 45900 किंमतीने सोने मिळेल.  दुसऱ्या सिरीजमध्ये तुम्ही आजपासून अर्थात 11 मेपासून ते 15 मे दरम्यान गोल्ड सॉव्हरेन बाँड्सचे सब्सक्रिप्शन घेऊ शकता. या बाँडचा हा हप्ता 19 मे रोजी जारी करण्यात येईल

(हे वाचा-मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यास चीनला 5 वर्ष द्यावी लागेल मोठी भरपाई)

त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे ऑनलाइन अर्ज करून सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,540  रुपयांनी सोने खरेदी करता येईल. या योजनेअंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे.

सॉव्हरेन गोल्डची खरेदी कुठे कराल?

Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गेल्या 3 दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

(हे वाचा-अयोध्या राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांसाठी खूशखबर!वाचा काय आहे मोदी सरकारचा निर्णय)

एप्रिलमध्ये जारी करण्यात आलेल्या सॉव्हरेन गोल्ड बाँड सिरीज- 1 मध्ये (Sovereign Gold Bond Scheme 2020-21-Series I ) निश्चित करण्यात आलेल्या सोन्याची किंमत प्रति तोळा 46390  रुपये होती. गोल्ड बाँडमध्ये एप्रिलमध्ये चांगल्या प्रमाणात गुंतवणूक झाली. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, एप्रिलमध्ये 17.73 लाख यूनिटसाठी जवळपास 822 कोटी सब्सक्रिप्शन मिळाले. ऑक्टोबर 2016 नंतरचे हे सर्वात मोठ्या प्रमाणात मिळालेले सब्सक्रिप्शन आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: