नवी दिल्ली, 11 मे : देशांतर्गत कंपन्यांना अधिक वाव मिळावा याकरता चीनमधून आयात होणाऱ्या 25 वस्तूंवर मोदी सरकार (Modi Government) अँटी डंपिंग ड्यूटी वाढवण्याची शक्यता आहे. कॅलक्यूलेटर आणि यूसीएसबी ड्राइव्हपासून स्टील, सोलर सेल आणि व्हिटामीन ई पर्यंत जवळपास 2 डझनपेक्षा अधिक चिनी वस्तूंवरील अँटी डंपिंग ड्यूटी लवकरच संपणार आहे. त्यामुळे या वस्तूंवरील डंपिंग ड्यूटी वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. अँटी डंपिंग ड्यूटी संपल्यानंतर देशांतर्गत बाजारात चिनी वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी देशांतर्गत तयार होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीवर याचा परिणाम होईल आणि जवळपास व्यवसाय संपुष्टात येण्याची नामुष्की येईल. परिणामी स्वदेशी वस्तूंचे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून या चिनी वस्तूंवरील अँटी डंपिंग ड्यूटी आणखी 5 वर्षांसाठी वाढवली जाण्याची शक्यता आहे.
(हे वाचा-कोरोनाचं केंद्र झालेल्या वुहानमधून 36 दिवसांनी पहिल्यांदाच आली वाईट बातमी)
2018-19 साली चीनकडून भारताने एकूण 70.32 अब्ज डॉलर इतकी आयात केली होती. यामध्ये या 25 वस्तूंचा अधिक समावेश होता. या वस्तूंवर अँटी डंपिग ड्यूटी आकारली जाते आणि तिची मुदत यावर्षी संपणार आहे. सोलर सेल आणि मोड्यूलवरील सेफगाार्ड ड्यूटी 30 जुलै 2018 पासून आकारण्यात आली होती आणि ती 29 जुलै 2020 रोजी संपणार आहे. सरकारकडून यावर्षी अँटी डंपिंग आणि सेफगार्ड ड्यूटी संपत आलेल्या सर्व वस्तूंचे निरीक्षण करण्यात येत आहे.
कोणत्या 25 वस्तूंचा यामध्ये समावेश?
चीनमधून आयात होणाऱ्या सोडियम सायट्रेट, यूएसबी आणि फ्लॅश ड्राइव्ह, कॅलक्यूलेटर, स्टेनलेस स्टीलचे हॉट रोल्ड फ्लॅट उत्पादनं, व्हिटामिन सी आणि ई, नायलॉन टायर कॉर्ड, टेप, सीएफएल, कास्टिक सोडा, फ्लोट ग्लास, टेबलवेअर, भांडी, प्लास्टिक प्रसंस्करण मशीनरी आणि सोलर सेल या वस्तूंचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Xi Jinping