अयोध्येतील राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांसाठी खूशखबर! वाचा काय आहे मोदी सरकारचा निर्णय

अयोध्येतील राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांसाठी खूशखबर! वाचा काय आहे मोदी सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की, राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांंना इनकम टॅक्समध्ये (Income Tax) सूट देण्यात येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : जर तुम्ही अयोध्येमध्ये बनणाऱ्या राम मंदिरासाठी (Ram Mandir) दान देण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की, राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांंना इनकम टॅक्समध्ये (Income Tax) सूट देण्यात येईल. यावर्षी 5 फेब्रुवारीला श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट बनवण्यात आला होता आणि मंदिर बनवण्यासाठी येणारे सर्व दान या ट्रस्टकडे जमा करण्यात येणार आहे. दान देणाऱ्यांना 80G अंतर्गत इनकम टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. शुक्रवारी सरकारने या निर्णयाबाबत अधिसूचना जारी केली आहे.

80G अंतर्गत सूट

शुक्रवारी एक अधिसूचना जारी करत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टला एक ऐतिहासिकदृष्ट्या  महत्त्वाचे आणि सार्वजनिक पुजेचे स्थान म्हटले आहे.

(हे वाचा-मोदी सरकारकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी,11 मेपासून करू शकता गुंतवणूक)

कलम 80G अंतर्गत ट्रस्टमध्ये दान करणाऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. याआधी ट्र्स्टच्या मिळकतीलाही कलम 11 आणि 12 अंतर्गत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक धार्मिक स्थळांना मिळाली सूट

80G अंतर्गत सर्व धार्मिक स्थळांना सूट मिळत नाही. कोणत्याही धार्मिक स्थळांना कलम 11 आणि 12 अंतर्गत इनकम टॅक्समध्ये सूट मिळवायचे रजिस्ट्रेशन करण्याकरता अर्ज करावा लागतो, त्यानंतर 80G अंतर्गत सूट प्राप्त होते. याआधी 2017 मध्ये केंद्र सरकारने काही धार्मिक स्थळांना 80G अंतर्गत सूट दिली आहे. चेन्नईमधील अरुलमिगु कपालेश्वर थिरुकोइल, अरियाकुडी श्री श्रीनिवास पेरुमल मंदिर आणि महाराष्ट्रातील सज्जनगड येथील रामदास स्वामी समाधी मंदिर आणि रामदास स्वामी मठ या धार्मिक स्थळांना सूट मिळाली आहे.

(हे वाचा-नोकरी गेली तरी नो टेन्शन! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार)

आयकरच्या कलम 80जी अंतर्गत सामाजिक, राजकीय किंवा जनहितार्थ असणाऱ्या संस्थांबरोबरच सरकारी सहाय्याता निधीमध्ये दान केलेल्या रकमेवर टॅक्समध्ये सूट मिळवण्याचा अधिकार आहे. ही सूट प्रत्येक दानासाठी समान नसते. याकरता काही नियम व अटी देखील लागू केल्या जातात.

कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे राम मंदिराचे निर्माण कार्य थांबले आहे. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काहीशी सूट मिळाल्यामुळे याठिकाणी थोडेफार काम सुरू झाले आहे. साफसफाई, जमीन सपाटीकरणाची काम इथे सुरु झाली आहेत.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 9, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या