Home /News /money /

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; पाहा Top Gainer-Top Looser शेअर्स

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; पाहा Top Gainer-Top Looser शेअर्स

BSE Sensex आज 336.46 अंकांनी घसरणीसह 60,923.50 वर बंद झाला. NSE Nifty 88.50 अंकांनी खाली येत 18,178.10 वर बंद झाला.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Share Market Today) आज घसरण झाली. वीकली एक्सपायरीचा दिवस शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरला. दिवसभर बाजारात विक्री दिसून आली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आज 336.46 अंक किंवा 0.55 टक्क्यांच्या घसरणीसह 60,923.50 वर बंद झाला. तर NSE Nifty 88.50 अंकांनी म्हणजेच 0.48 टक्के खाली 18,178.10 वर बंद झाला. आज, बहुतेक बँकिंग शेअर्समध्ये नफा दिसून आला. त्याचबरोबर मेटल, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाली. आज तेजीत असलेले शेअर्स कोटक महिंद्राच्या (Kotak Mahindra Shares) शेअरने आज BSE वर सर्वाधिक 6.51 टक्क्यांची झेप घेतली. यानंतर, एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) शेअर्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. याशिवाय एनटीपीसी, एसबीआय, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा आणि बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. Rakesh Jhujhunwala यांनी आपल्या आवडत्या कंपनीत गुंतवणूक वाढवली, यावर्षी कंपनीकडून 60 रिटर्न्स मोठी घसरण झालेले शेअर्स एशियन पेंटचा (Asian Paints Stock) स्टॉक सर्वात जास्त 5.21 टक्क्यांनी घसरला. रिलायन्स, इन्फोसिस, डॉ. रेड्डी, टाटा स्टील, टीसीएसचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आले. त्याचबरोबर भारती एअरटेल, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, आयटीसी, टायटन, बजाज फायनान्स, एम अँड एम, मारुतीसह अनेक शेअर्समध्ये पडझड झालेली पाहायला मिळाली. सरकारकडून करदात्यांच्या खात्यात 92,961 कोटी रुपये रिफंड, तुमचं रिफंड स्टेटस कसं चेक कराल? Top Gainer आणि Top Looser कोटक बँक, टाटा मोटर्स, ग्रासिम, एचडीएफसी आणि बीपीसीएलचे शेअर्स आज NSE वर टॉप गेनर्स होते. दुसरीकडे, एशियन पेंट, हिंडाल्को, इन्फोसिस, रिलायन्स आणि टीसीएसचे शेअर टॉप लूझर ठरले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Share market, Stock Markets

    पुढील बातम्या