• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Rakesh Jhujhunwala यांनी आपल्या आवडत्या कंपनीत गुंतवणूक वाढवली, यावर्षी कंपनीकडून 60 रिटर्न्स

Rakesh Jhujhunwala यांनी आपल्या आवडत्या कंपनीत गुंतवणूक वाढवली, यावर्षी कंपनीकडून 60 रिटर्न्स

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत टायटनमध्ये एकूण 4.87 टक्के हिस्सा आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑक्टोबर : राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwal) यांच्या शेअर बाजारातील बारीक-बारीक हालचलींवर किरकोळ गुंतवणूकदार लक्ष ठेऊन असतात. कारण राकेश झुनझुनवाला यशस्वी आणि मोठे गुंतवणूकदार असल्याने ते ज्या कंपनीत गुंतवणूक करतात तिथे फायदा होण्याची शक्यता जास्त असते. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhujhunwala) यांनी गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच टायटनच्या (Titen) शेअर्समधील आपली हिस्सेदारी वाढवली ​​आहे. म्हणजेच डिसेंबर 2019 नंतर राकेश झुनझुनवाला यांनी यावर्षी सप्टेंबर तिमाहीत टायटनमध्ये शेअर विकत घेतले आहेत. सप्टेंबर तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांनी सरकारी स्टील कंपनी सेलमध्येही गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत टायटनमध्ये एकूण 4.87 टक्के हिस्सा आहे. यापूर्वी जून तिमाहीत, त्याच्याकडे एकूण 4.81 टक्के हिस्सा होता. 'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी रेखा झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत टायटनमधील त्यांचे शेअर्स कमी करून 9,540,575 केले जे जून तिमाहीत 9,640,575 शेअर्स होते. तर राकेश झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत टायटनमधील त्यांचे शेअर्स जून 2021 च्या तिमाहीत 33,010,395 वरुन म्हणजेच 3.72 टक्क्यांवरुन 33,760,395 पर्यंतर 3.80 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. सरकारकडून करदात्यांच्या खात्यात 92,961 कोटी रुपये रिफंड, तुमचं रिफंड स्टेटस कसं चेक कराल? डिसेंबर 2019 च्या तिमाहीनंतर राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीने शेअर वाढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोघांचाही टायटनमध्ये 6.7 टक्के हिस्सा आहे. गुरुवारी टायटनचे शेअर 0.43 टक्के खाली घसरून 2401.95 रुपयांवर बंद झाले. ताज्या शेअर्सच्या किंमतीनुसार, राकेश झुनझुनवाला आणि रेखा यांच्याकडे एकूण 10,393 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत सेलमधील (SAIL) आपला हिस्सा 1.39 टक्क्यांवरून 1.76 टक्के केला आहे. दरम्यान, राकेशझुनझुनवाला यांनी MCX आणि ल्युपिनमधील (LUPIN) आपला हिस्सा कमी केला आहे. टाटा मोटर्स कंपनीत सुमारे 3,77,50,000 शेअर्स  राकेश झुनझुनवाला यांचे टाटा मोटर्स कंपनीत सुमारे 3,77,50,000 शेअर्स किंवा 1.14 टक्के हिस्सा आहे. 2021 मध्ये टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 290 रुपयांवरून 477 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: