Home /News /money /

सरकारकडून करदात्यांच्या खात्यात 92,961 कोटी रुपये रिफंड, तुमचं रिफंड स्टेटस कसं चेक कराल?

सरकारकडून करदात्यांच्या खात्यात 92,961 कोटी रुपये रिफंड, तुमचं रिफंड स्टेटस कसं चेक कराल?

आयकर विभागाने 61,53,231 व्यक्तींच्या संदर्भात 23,026 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : करदात्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) 63.23 लाखांहून अधिक करदात्यांच्या खात्यात आयटीआर रिफंडचे 92,961 कोटी रुपये जारी केले आहेत. आयकर विभागाने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 एप्रिल 2021 ते 18 ऑक्टोबर 2021 दरम्यान हे रिफंड जारी केले आहेत. आयकर विभागाने 61,53,231 व्यक्तींच्या संदर्भात 23,026 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. तर 1,69,355 कॉर्पोरेट टॅक्स रिफंडमध्ये 69,934 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. आयकर विभागाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सरकारने आयकर रिटर्न ( Income tax Return- ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी मे महिन्यात सीबीडीटीने आयटीआर दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती, परंतु ती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. तुमच्याकडेही आहेत PPF ची एकापेक्षा अधिक खाती? या सोप्या पद्धतीनं करा विलीन आता असे अनेक करदाते आहेत त्यांना अद्याप त्यांचे रिफंड मिळालेले नाहीत. त्यांच्यासाठी आयकर विभागाचे म्हणणे आहे की विभाग अशा करदात्यांशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आहे ज्यांना अद्याप 2020-21 साठीचा रिफंड मिळालेला नाही. यासाठी करदात्यांचा प्रतिसाद आवश्यक असेल. बहुतेक प्रकरणांमध्ये, कलम 245 अंतर्गत बँक खाती मिसमॅच झाल्याने रिफंड फेल झालेले असू शकतात. तुमचं रिफंड स्टेटस कसं चेक कराल? आयकर विभागाने पाठवलेल्या रिफंडची स्थिती तपासण्यासाठी आयकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे लॉग इन केल्यानंतर, आयकर रिफंडचा पर्याय दिसेल. तेथे तुम्ही आपल्या रिफंडची स्थिती तपासू शकता. PPF वरील व्याजदर किती असावा? काय आहे RBI चं म्हणणं नवीन आयकर पोर्टल कसं वापराल? >> आयकर विभागाची वेबसाईट www.incometax.gov.in वर जा आणि तुमचा पॅन यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून खात्यात लॉग इन करा. >> लॉग इन केल्यानंतर E-File पर्यायावर क्लिक करा. ई-फाइल पर्यायाअंतर्गत Imcome Tax Return निवडा आणि नंतर View Filled Return पर्यायावर क्लिक करा. >> यानंतर तुम्ही दाखल केलेले Latest ITR तपासा. View Details पर्याय निवडा. पर्यात निवडल्यानंतर, तुम्हाला दाखल केलेल्या ITR चं स्टेटस दिसेल. यामध्ये, तुम्हाला टॅक्स रिफंड जारी करण्याची तारीख, रिफंड केलेली रक्कम आणि या वर्षाची थकबाकी असलेल्या कोणत्याही परताव्याच्या मंजुरीची तारीख देखील दिसेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Income tax, Investment, Money

    पुढील बातम्या