मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LPG Price: रशिया-युक्रेन युद्धाचा तुमच्या खिशावर परिणाम; गगनाला भिडणार घरगुती गॅसच्या किमती

LPG Price: रशिया-युक्रेन युद्धाचा तुमच्या खिशावर परिणाम; गगनाला भिडणार घरगुती गॅसच्या किमती

पेट्रोल (Petrol and Diesel) आणि डिझेलपाठोपाठ आता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ होणार आहे. सातत्याने होत असलेला तोटा पाहता पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर तेल कंपन्या एलपीजीच्या किमती वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 03 मार्च: पेट्रोल (Petrol and Diesel) आणि डिझेलपाठोपाठ आता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ होणार आहे. सातत्याने होत असलेला तोटा पाहता पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर तेल कंपन्या एलपीजीच्या किमती वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी एलपीजीच्या किमती वाढवल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial gas cylinder) किमती 105 रुपयांनी वाढल्या आहेत. खरं तर, रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia-Ukraine War) कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता, तेल कंपन्या आता व्यावसायिक गॅस सिलेंडरनंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. सध्या पाच किलो एलपीजी सिलेंडरच्या दरातही 27 रुपयांनी वाढ झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर घरगुती गॅस सिलेंडरसोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. हे वाचा-Google, Apple, Tesla चे शेअर्सचं आजपासून NSE IFSC वर ट्रेडिंग, कसा मिळणार फायदा? व्यावसायिक आणि 5 किलो सिलेंडरचे दर वाढले 1 मार्चपासून वाढलेल्या किमतीनुसार, राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1907 रुपयांवरुन 2012 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. पाच किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची किंमत 27 रुपयांनी वाढून 569.5 रुपये झाली आहे. कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सध्यातरी कोणताही बदल केलेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 6 ऑक्टोबर 2021 पासून स्थिर आहेत. मात्र निवडणुकीनंतर (Election) हे दर वाढण्याची शक्यता आहे. 119 दिवसांत पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही गेल्या 119 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लीटर पाच रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपयांनी कपात केली होती. यानंतर अनेक राज्य सरकारांनी त्यांचेही कर कमी केले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (Crude oil) सरासरी किंमत प्रति बॅरल 82 डॉलर होती. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान कच्च्या तेलाने 104 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हे वाचा-रिलायन्सने फ्यूचर ग्रुपचा ताबा घेतल्याने कर्मचारी, मालक, विक्रेते टेन्शन फ्री! प्रमुख शहरातील गॅसच्या किमती दिल्ली 899.50 रुपये बिहार 979.50 रुपये मुंबई 899.50 रुपये मध्य प्रदेश 905.50 रुपये राजस्थान 903.50 रुपये पंजाब 933.00 रुपये उत्तर प्रदेश 897.50 रुपये उत्तराखंड 918.50 रुपये झारखंड 957.00 रुपये छत्तीसगड 971.00 रुपये हे वाचा-इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं निर्मितीसाठी Reliance-Sanmina मधील करार ठरेल महत्त्वाचा तुमच्या शहरातील गॅसचे दर असे जाणून घ्या तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावं लागेल. दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर (Price) जाहीर केले जातात.
First published:

Tags: LPG Price, Russia Ukraine

पुढील बातम्या