जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरमध्ये 48 टक्क्यांची घसरण, तज्ज्ञांचं मत काय?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरमध्ये 48 टक्क्यांची घसरण, तज्ज्ञांचं मत काय?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरमध्ये 48 टक्क्यांची घसरण, तज्ज्ञांचं मत काय?

नझारा टेक्नॉलॉजीजच्या प्राईज हिस्ट्रीबद्दल माहिती घेऊयात. 30 मार्च 2021 रोजी, नझाराचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर 1,990 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध झाला. त्याच दिवशी तो 1,552 रुपयांवर बंद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मार्च : दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा (Rakesh Jhunjhunwala Portfolio) भाग असलेल्या Nazara Technologies चा शेअर 21 जानेवारी 2022 पासून 36 टक्के घसरला आहे. शुक्रवारी 12 वाजता शेअर 1737 रुपयांवर ट्रेड करत होता. जर आपण त्याच्या सर्वोच्च स्तरावरून घसरणीबद्दल बोललो तर हा स्टॉक आतापर्यंत 48 टक्के खाली आला आहे. तुमच्याकडेही हा शेअर असेल तर काय करावं याबद्दल माहिती घेऊयात. नझारा टेक्नॉलॉजीजच्या प्राईज हिस्ट्रीबद्दल माहिती घेऊयात. 30 मार्च 2021 रोजी, नझाराचा शेअर (Nazara Technologies Ltd share Price) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर 1,990 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध झाला. त्याच दिवशी तो 1,552 रुपयांवर बंद झाला. यानंतर, 15 सप्टेंबर 2021 पर्यंत, हा स्टॉक 1,980 ते 1450 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत राहिला. 14 सप्टेंबर रोजी, या स्टॉकने 1980 ची पातळी ओलांडली आणि 11 ऑक्टोबर 2021 रोजी शेअरने 3,356 रुपयांचा उच्चांक गाठला. बाजार तज्ज्ञांचं मत काय? बाजार तज्ञांना वाटते की हा स्टॉक 1500-1600 रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे चांगले होईल. यानंतर, एका वर्षाच्या आत, हा स्टॉक 2100 रुपयांपर्यंतचे टार्गेट देऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी (Long Term Invesstors) ही एक उत्तम संधी असेल. रशिया-युक्रेन युद्धाचा तुमच्या खिशावर परिणाम; गगनाला भिडणार घरगुती गॅसच्या किमती सपोर्ट झोनमध्ये खरेदी करण्याची संधी राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या स्टॉकवर बोलताना, प्रोफिशिएंट इक्विटीज प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक आणि संचालक मनोज दालमिया यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की, नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सला 1527 च्या पातळीवर मजबूत सपोर्ट मिळत आहे, तर त्याचा इमिडिएट सपोर्ट 1685 रुपयांवर आहे. त्यामुळे हा शेअर सपोर्ट झोनमध्ये खरेदी करता येईल. GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले की, नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 1500 ते 1600 रुपयांच्या रेंजमध्ये चांगली खरेदी संधी तयार करतील अशी अपेक्षा आहे. काही काळ प्रतीक्षा करावी, कारण स्टॉक काही काळ कन्सॉलिडेट राहू शकतो. रशिया-युक्रेन युद्धाचा जागतिक शेअर बाजारांवर आणखी परिणाम होऊ शकतो. कंपनीची उपस्थिती हॉस्पिटॅलिटी आणि ऑनलाईन गेमिंग व्यवसायात असल्याने, कंपनी कोविड-19 नंतर दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकते. शेअरमध्ये 1500 ते 1600 रुपयांच्‍या रेंजमध्‍ये 2100 च्‍या एका वर्षाच्या टार्गेटसाठी खरेदी करण्‍याची शिफारस केली आहे. यासाठी स्टॉप लॉस 1400 च्या पातळीवर राखला गेला पाहिजे. आता पतंजलीचं क्रेडिट कार्डही लाँच, ग्राहकांना मिळणार या सुविधा राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग BSE शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, भारतातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 10.10 टक्के शेअर्स आहेत. हा डेटा 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात