मोदी सरकारकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची दुसरी संधी, 11 मेपासून करू शकता गुंतवणूक

मोदी सरकारकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची दुसरी संधी, 11 मेपासून करू शकता गुंतवणूक

घरबसल्या स्वस्त सोन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून आणखी एक संधी देण्यात येत आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : घरबसल्या स्वस्त सोन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून आणखी एक संधी देण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.  सॉव्हरेन गोल्ड बाँड 20 एप्रिल ते 2 सप्टेंबरपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येणार आहेत. 20 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान हे गोल्ड बाँड खरेदी करण्याचा पहिला टप्पा पार पडला. आता 11 मे ते 15 मेपर्यंत असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वस्त सोनेखरेदी करता येणार आहे.  याकरता प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 4,590 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतून तुम्हाला प्रति तोळा 45900 किंमतीने सोने मिळेल. त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे ऑनलाइन अर्ज करून सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,540  रुपयांनी सोने खरेदी करता येईल

(हे वाचा-नोकरी गेली तरी नो टेन्शन! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार)

या योजनेअंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड सिरीज- 1 मध्ये (Sovereign Gold Bond Scheme 2020-21-Series I ) निश्चित करण्यात आलेल्या सोन्याची किंमत प्रति तोळा 46390  रुपये होती. गोल्ड बाँडमध्ये एप्रिलमध्ये चांगल्या प्रमाणात गुंतवणूक झाली.

(हे वाचा- सोन्याचांदीच्या दरात शुक्रवारी मोठा बदल, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव)

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, एप्रिलमध्ये 17.73 लाख यूनिटसाठी जवळपास 822 कोटी सब्सक्रिप्शन मिळाले. ऑक्टोबर 2016 नंतरचे हे सर्वात मोठ्या प्रमाणात मिळालेले सब्सक्रिप्शन आहे. दुसऱ्या सिरीजमध्ये तुम्ही 11 मे ते 15 मे दरम्यान गोल्ड सॉव्हरेन बाँड्सचे सब्सक्रिप्शन घेऊ शकता. हे बाँड 19 मे रोजी जारी करण्यात येतील.

इथे कराल सॉव्हरेन गोल्डची खरेदी

Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गेल्या 3 दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

सॉव्हरेन गोल्ड म्हणजे काय?

या योजनेची सुरूवात नोव्हेंबर 2015 मध्ये झाली होती. फिजिकल गोल्ड (Physical Gold)च्या मागणी कमी करणे त्याचप्रमाणे घरगुती बचतीऐवजी वित्तिय बचत करण्यास प्रोत्साहन देणे, हे याचं उद्दिष्ट्य आहे. घरामध्ये सोने खरेदी करून साठवून ठेवण्याऐवजी तुम्ही सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता आणि टॅक्स देखील वाचवू शकता.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 9, 2020, 10:29 AM IST

ताज्या बातम्या