मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्याचांदीच्या दरात शुक्रवारी मोठा बदल, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

सोन्याचांदीच्या दरात शुक्रवारी मोठा बदल, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

देशभरात लॉकडाऊन सुरू असून देखील शुक्रवारी सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

देशभरात लॉकडाऊन सुरू असून देखील शुक्रवारी सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

देशभरात लॉकडाऊन सुरू असून देखील शुक्रवारी सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

नवी दिल्ली, 08 मे : देशभरात लॉकडाऊन सुरू असून देखील शुक्रवारी सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव बुधवारच्या दरांच्या तुलनेत 357 रुपयांनी वाढत होत 46,221 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याची किंमत शुक्रवारी सकाळी 42,338 रुपये प्रति तोळा होती. शुक्रवारी एससीएक्स एक्सचेंजवर चांदीच्या वायदा किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. चांदीच्या वायदा किंमतीमध्ये 0.71 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या स्पॉट मागणीमुळे जुलै महिन्यासाठी चांदीचा वायदा भाव 43,431 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

(हे वाचा- LockDown: या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार कापणार, मेपासून तीन महिन्यांसाठी निर्णय)

चांदीमध्ये 308 रुपये प्रति किलोची वाढं झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळालं. चांदीचा सप्टेंबरचा वायदा भाव आज 43894  रुपये प्रति किलो राहिला आहे. यामध्ये 371 रुपयांची वाढ झाली आहे.

घरबसल्या करा सोन्यामध्ये  गुंतवणूक

भारत सरकारच्या सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमचा (Sovereign Gold Bond Scheme) दुसरा टप्पा सुरू होणार आहे. 11 मे ते 15 मे दरम्यान या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. 8 सप्टेंबरपर्यंत ही योजना सहा टप्प्यामध्ये असणार आहे. सहा वेळा गुंतवणुकीची संधी तुम्हाला मिळणार आहे.

(हे वाचा-स्वस्त औषधं आणि व्हॉट्सअ‍ॅप-ईमेलवरून ऑर्डर, लॉकडाऊनध्ये मोदी सरकारची विशेष योजना)

एप्रिलमध्ये या योजनेचा पहिला हप्ता उघडण्यात आला होता. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते

कशी ओळखाल सोन्याची शुद्धता?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916 किंवा 875 असे अंक लिहीलेले असतात. याच अंकांवरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर सोनं 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.

संपादन - जान्हवी भाटकर

First published:
top videos

    Tags: Gold and silver prices today