• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • PF Interest: 6.5 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, तुम्हाला मिळालं की नाही ते अशाप्रकारे तपासा

PF Interest: 6.5 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, तुम्हाला मिळालं की नाही ते अशाप्रकारे तपासा

केंद्र सरकारने 6.5 कोटी लोकांना दिवाळीचं धमाकेदार गिफ्ट (Diwali Gift) देऊ केलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employee Provident Fund Organization Latest News) सदस्यांना पीएफवरील व्याजाचे पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात झाली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: केंद्र सरकारने 6.5 कोटी लोकांना दिवाळीचं धमाकेदार गिफ्ट (Diwali Gift) देऊ केलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employee Provident Fund Organization Latest News) सदस्यांना पीएफवरील व्याजाचे पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्स तपासून हे पाहू शकता की तुम्हाला पीएफवर व्याजाचे हक्काचे पैसे मिळाले आहेत की नाही. तुम्ही घरबसल्या (How to check PF Balance online) हे काम पूर्ण करू शकता. त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. किती मिळत आहे व्याज? मोदी सरकारने (Modi Government) याआधीच आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याजाने (PF Interest Rate) पैसे ट्रान्सफर करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला होता. कामगार मंत्रालयाने देखील या निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता पीएफवरील व्याजाची 8.5 टक्क्यांची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. अशावेळी तुम्ही नोकरदार वर्गातील असाल तर तुम्हाला याचा फायदा मिळेल. तुम्ही एकूण चार पद्धतीने पीएफचा बॅलन्स तपासू शकता. वाचा-अजीम प्रेमजींनी यावर्षी दररोज 27 कोटी केले दान; भारतातील टॉप 5 दानशूर व्यक्ती जाणून घ्या पीएफमध्ये किती आहे बॅलन्स... 1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स- SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. 2. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance- यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता. हे वाचा-Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीसह पुन्हा वधारला सोन्याचा भाव 3. Umang App च्या माध्यमातून- याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता. 4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक- याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: