• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • अजीम प्रेमजींनी यावर्षी दररोज 27 कोटी केले दान; कोण आहेत भारतातील टॉप 5 दानशूर?

अजीम प्रेमजींनी यावर्षी दररोज 27 कोटी केले दान; कोण आहेत भारतातील टॉप 5 दानशूर?

EdelGive Hurun India Philanthropy list 2021 नुसार, अजीम प्रेमजींनी कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या देणग्यांमध्ये जवळपास एक चतुर्थांश वाढ केली. त्यांच्या खालोखाल एचसीएलचे Shiv Nadar यांनी दान केले.

 • Share this:
  अजीम प्रेमजींनी यावर्षी दररोज 27 कोटी केले दान; कोण आहेत भारतातील टॉप 5 दानशूर?मुंबई, 28 ऑक्टोबर : माहिती तंत्रज्ञान (Information Technogy) कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी (Azim Premji) यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 9,713 कोटी रुपये किंवा दररोज 27 कोटी रुपये दान केले. यासह त्यांनी सेवाभावी कार्य करणाऱ्या भारतीयांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलॅन्थ्रॉपी लिस्ट 2021 (EdelGive Hurun India Philanthropy list 2021) नुसार, अजीम प्रेमजींनी कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या देणग्यांमध्ये जवळपास एक चतुर्थांश वाढ केली. त्यांच्या खालोखाल एचसीएलचे शिव नाडर (Shiv Nadar, HCL Group) यांनी दान केले. त्यांनी ज्यांनी विविध कामांसाठी 1,263 कोटी रुपयांची देणगी दिली. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेटचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी देखील 577 कोटी रुपयांच्या योगदानासह यादीत तिसऱ्या स्थानी आहे. कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) 377 कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहेत. Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीसह पुन्हा वधारला सोन्याचा भाव, तपासा आजचा दर देशाचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani)हे आपत्ती निवारणासाठी 130 कोटी रुपयांच्या देणगीसह देणगीदारांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Neelkeni) यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून 183 कोटी रुपयांच्या देणगीसह ते यादीत पाचव्या स्थानावर आहेत. शीर्ष दहा देणगीदारांमध्ये हिंदुजा कुटुंब, बजाज कुटुंब, अनिल अग्रवाल आणि बर्मन कुटुंबाचा समावेश आहे. वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, पेट्रोल 120 रुपयांवर, डिझेल 111 वर Harun India चे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ रिसर्चर अनस रहमान जुनैद म्हणाले की, सध्या, मूलभूत गरजांमुळे बहुतांश पैसा शिक्षण आणि आरोग्य सेवेसारख्या मूलभूत कामांसाठी दिला जात आहे. शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक राकेश झुनजुनवाला यांच्यासह काही नवीन नावे यादीत जोडली गेली आहेत, ज्यांनी शैक्षणिक कामांसाठी आर्थिक वर्ष 2021 मध्ये आपल्या एकूण कमाईचा एक चतुर्थांश किंवा 50 कोटी रुपये दान केले आहेत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: