मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये झालेत बदल

शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये झालेत बदल

सेबीने (SEBI) काही मोठे निर्णय घेतले आहेत.

सेबीने (SEBI) काही मोठे निर्णय घेतले आहेत.

सेबीने (SEBI) काही मोठे निर्णय घेतले आहेत.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : मार्केट रेगुलेटर सेबीने (SEBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅश मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सेबीनं दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सेबीने कॅश शेअरवर वाढवलेल्या मार्जिनवर सेबीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून कॅश मार्केटच्या नॉन F&O वर मार्जिन कमी केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेबीनं बाजारामध्ये जे तत्कालीन बदल केले होते त्यानुसार इंडिव्हिजुअल स्टॉक्सवर मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत घेतलेल्या सर्व नियमांना परत घेतलं असून वायदा बाजारामध्ये केलेले बदल आहे तसेच राहणार आहेत.

CNBC आवाजने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. मार्केट रेगुलेटर SEBI ने कॅश शेअरवर मिळणाऱ्या मार्जिनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. वायदा बॅनवरदेखील थोडी सवलत दिली आहे. आता यापुढे शेअर 95 व्या क्रमांकावरच बॅन होणार आहे.

बदलणार ट्रेंडिंगचा नियम

मार्जिन कमी झाल्यामुळे कुस्त्या लोकं ट्रेडिंग करू शकणार आहेत. तसंच त्यांची ट्रेडिंग लिमिटदेखील वाढणार आहे. तसंच स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये लिक्विडीटीदेखील वाढणार आहे.

26 नोव्हेंबरपासून नियम लागू

कॅश शेअरवर वाढवलेल्या मार्जिनवर सेबीनं महत्त्वाचा निर्णय घेतला असून कॅश मार्केटच्या  नॉन F&O व्यवहारांवर मार्जिन कमी केलं आहे. 26 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला. 20 मार्चला हे मार्जिन वाढवण्यात आलं होतं. याअंतर्गत 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन वाढवलं होतं. यामध्ये 20 टक्के सर्किटवाल्या शेअरवर जास्त मार्जिन मिळत होतं. मात्र मार्केट फिडबॅकनंतर हे कमी करण्याचा निर्णय सेबीनं घेतला आहे.

हे वाचा - असा BOSS आपल्यालाही हवा! फक्त एक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना क्षणात बनवलं करोडपती

सेबीच्या या नवीन नियमानंतर F&O शेअरच्या वायदा बॅन नियमांमध्ये दिलासा मिळणार आहे. याचबरोबर शेअरच्या जागेतदेखील बदल होणार असून 95 व्या क्रमांकाला शेअर बॅन होणार आहे. याआधी 5 दिवसांत 15 टक्के शेअरवर गेल्यानंतर 50 व्या क्रमांकालाच बॅन होत असे. F&O मध्ये डायनॅमिक प्राइसिंग चालू राहणार असून सर्किटवर 15 मिनिटांचा कुलिंग ऑफ राहणार आहे.

ओव्हरऑल मार्जिनमध्ये बदल नाही

वेगळ्या प्रक्रियेमधून जे ओव्हरऑल मार्जिन जमा होत असे तेदेखील 1 डिसेंबरपासून वाढवण्यात येणार आहे. हे सेबीचे वेगळे सर्क्युलर असून जुन्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही. याचा परिणाम तुम्हाला वायदे बाजारात आणि रोख रकमेवर पडलेला दिसून येणार आहे.

हे वाचा - शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे? सोप्या पद्धतीने Groww मध्ये उघडा डिमॅट अकाउंट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेबीनं बाजारामध्ये जे तत्कालीन बदल केले होते त्यामध्येदेखील दिलासा दिला आहे. कोरोनामुळे बाजारात खूप उलथापालथ झालेली होती. त्यामुळे मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली होती. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आले आहेत.

First published:

Tags: Money, Sebi, Share market