

सामान्यपणे आपला पगार (payment) कधी वाढणार याची प्रतीक्षा प्रत्येक कर्मचाऱ्याला असते. पगारात काही हजारांची जरी वाढ झाली तरी आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र विचार करा जर फक्त एकाच फटक्यात तुम्हाला कंपनीकडून कोट्यवधी रुपये मिळाले तर. असं होणं शक्यच नाही असं तुम्ही म्हणाला. मात्र असं झालं आहे.


एका कंपनीच्या मालकानं असा निर्णय घेतला ज्यामुळे काही क्षणातच कंपनीतील बहुतेक कर्मचारी करोडपती झाले आहेत. खरंतर या कर्मचाऱ्यांनीही आपण करोडपती होऊ असा विचार केला नसेल.


ज्या कंपनीचे कर्मचारी करोडपती झालेत ती कंपनी म्हणजे ब्रिटनमधील द हट ग्रुप (The Hut Group). या कंपनीचे मालक मॅथ्यू मोल्डिंग (Matthew Moulding) यांनी स्वतःला आणि आपल्या कंपनीला फायदा झाल्यानंतर त्याचा लाभ कर्मचाऱ्यांनाही कसा घेता येईल याची व्यवस्था केली. (फोटो सौजन्य : आज तक)


जेव्हा कंपनीचा शेअर सर्वात वर चढला आणि कंपनीला भरपूर नफा झाला तेव्हा त्यांनी आपल्या कंपनीचे प्रॉफिट शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. कंपनीच्या प्रॉफिटमघील 830 दशलक्ष पाऊंड म्हणजे जवळपास 8183 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. त्यामुळे त्याच्या कंपनीचे बहुतेक कर्मचारी करोडपती झाले आहेत.


त्यांनी एक बाय बँक स्किम चालवली. सर्व कर्मचाऱ्यांसाठी ओपन स्किम होती. मॅनेजरनं या कर्मचाऱ्यांची एक यादी तयार करून मॅथ्यू यांना दिली. यामध्ये ड्रायव्हर्सपासून मॅथ्यू यांच्या पर्सनल असिस्टंट सर्वांचा समावेश होता. मॅथ्यू यांची पीए म्हणाली, इतके पैसे मिळालेत की वयाच्या 36 व्या वर्षीच ती रिटायरटमेंट घेऊ शकते.


आज तकच्या रिपोर्टनुसार ब्रिटिश वृत्तपत्र द मिररशी बोलताना मॅथ्यू यांनी सांगितलं, मला आणि माझ्या कंपनीला झालेला फायदा सर्वांना करून द्यायचा होता. त्यामुळे मी ही स्किम ठेवली होती. सर्वांना खूप पैसे मिळालेत. सध्या व्यवसायाबाबत लोक काही ना काही बोलत होते, मात्र शेअर वाढणार असा विश्वास मला होता. कुणीही परिपूर्ण नसतं मात्र फायदा आणि पैशांत भागीदारी सर्वांना हवी असते. (फोटो सौजन्य : आज तक)


द हट ग्रुप एक ई-कॉमर्स बिझनेस आहे. मॅथ्यू यांनी 2004 साली द हट ग्रुपची स्थापना केली होती. 48 वर्षांचे मॅथ्यू गेल्या 16 वर्षांपासून भरपूर पैसे कमवत आहेत. त्यांचा बिझनेस खूप चांगला चालतो आहे. त्यांना अनेक बिझनेस अवॉर्ड्स मिळाले आहेत. जगभरातील नेते त्यांना ओळखतात. (फोटो सौजन्य : आज तक)


जेव्हा कंपनीचे शेअर्स सर्वात जास्त वाढले आणि कंपनीला फक्त 15 दिवसांतच 63,505 कोटी रुपयांचा फायदा झाला. त्यावेळी त्यांनी आपल्या शेअरहोल्डर्सना 1.1 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 8122 कोटी रुपये बोनस दिल्याचा अंदाज आहे. सध्या हट ग्रुपचं मार्केट कॅपिटल 80,521 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. (फोटो सौजन्य : आज तक)