Home /News /money /

शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे? या सोप्या पद्धतीने Groww मध्ये उघडा डिमॅट अकाउंट; वाचा सविस्तर

शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे? या सोप्या पद्धतीने Groww मध्ये उघडा डिमॅट अकाउंट; वाचा सविस्तर

डिमॅट अकाउंट सामान्य बँक खात्याप्रमाणेच असते. डिमॅट खात्यात गुंतवणूकदाराला इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सिक्युरिटीज ठेवता येतात.

    नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: डिमॅट अकाउंट (Demat account) हे आपल्या सामान्य बँक खात्याप्रमाणेच असते. डिमॅट खात्यात गुंतवणूकदाराला इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सिक्युरिटीज ठेवता येतात. तुम्ही शेअर खरेदी केल्यास या खात्यामधून रक्कम कापली जाऊन ती कंपनीच्या खात्यात जमा होते. डिमॅट खातं उघडण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी कोणत्याही नोंदणीकृत ब्रोकरकडे जाऊन तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे खाते उघडू शकता. डिमॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म भरून त्यासोबत काही कागदपत्रे जोडण्याची गरज आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पर्सन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरु होते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचा युनिक क्लायंट आयडी आणि अकाउंट नंबर मिळतो. ग्रो (Groww) ही एक गुंतवणूक संस्था आहे जी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने डिमॅट खाते उघडण्यास मदत करते. या काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही Groww च्या मदतीने डिमॅट अकाउंट उघडू शकता. फॉलो करा या काही सोप्या स्टेप्स- -Groww अ‍ॅपवर लॉग इन करा. ‘स्टॉक’ टॅब खाली ‘कंप्लिट सेटअप’ वर क्लिक करा (हे वाचा-PM मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत 3 मोठे निर्णय, सामान्यांवर थेट परिणाम) -यानंतर ‘ओपन स्टॉक्स अकाउंट’ वर क्लिक करा. ग्रो वर डिमॅट खाते उघडण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही -यामध्ये तुमची माहिती, उत्पन्नाविषयी माहिती, तुमच्या व्यवसायाविषयी आणि कामाविषयी माहिती तसंच आई आणि वडिलांचं नाव टाकून केवायसी पूर्ण करा. सर्व माहिती तपासून Next या बटनवर क्लिक करा. -ड्रॉप-डाऊन सूचीमधून trading experience निवडा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. -या स्टेपमध्ये तुम्हाला आधार क्रमांकाच्या मदतीने ई- साइन करावी लागणार आहे. तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही ई साइन केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. ई साइन करण्यासाठी तुम्हाला ‘E-SIGN AOF या पर्यायावर क्लिक करायचे आहे. -मोबाईल क्रमांक आधारला लिंक असल्यास त्यावर आलेला ओटीपी टाकून तुम्हाला ‘सबमिट’ या बटनावर क्लिक करायचं आहे. -डिमॅट अकाउंटचा फॉर्म नीट वाचून ‘Sign Now’ वर क्लिक करून पुढे जावे. (हे वाचा-Gold Price Today: मोठ्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, वाचा काय आहेत नवे दर) -याठिकाणी तुम्हाला एनएसडीएल इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी सेवेच्या वेबासाइटवर रिडायरेक्ट केले जाईल.  त्यानंतर आधार क्रमांक किंवा व्हर्च्यूअल आधार आयडी टाकून ‘सेंड ओटीपी’ या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर हा ओटीपी टाकून ई-साइन करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. -यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ‘Signed successfully’ असा संदेश दिसेल. आपण आता गुंतवणूक सुरू करू शकता अशी सूचना येईल. त्यावर लेट्स स्टार्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर करून पुढे जाऊ शकता. 24 तासामध्ये व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्ही Groww च्या माध्यामातून शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या