मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूशखबर! Home Loan झालं स्वस्त, 31 मार्चपर्यंत खास ऑफर

घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूशखबर! Home Loan झालं स्वस्त, 31 मार्चपर्यंत खास ऑफर

घर खरेदी (Buying Home) करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

घर खरेदी (Buying Home) करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

घर खरेदी (Buying Home) करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

नवी दिल्ली, 03 मार्च : घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी (Home Buyers) एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे बँकांनी गृहकर्जाचे (Home loans) व्याजदर कमी केले असून, आता अतिशय अल्प व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे सध्या गृह खरेदीसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे, मात्र ही सवलत 31 मार्चपर्यंतच मिळणार असल्यानं ग्राहकांनी वेळीच निर्णय घेणं आवश्यक आहे.

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (State Bank of  India) कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. भारतीय स्टेट बँकेनं गृहकर्जाचे व्याजदर 70 आधारभूत अंकांनी स्वस्त केले आहेत. म्हणजेच गृहकर्जाचे व्याजदर आधीच्या दरापेक्षा 0.7 टक्क्यानं घटवले आहेत. त्यामुळं बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर 6.70 टक्के झाला आहे. स्टेट बँकेनंही ही सवलतीचा व्याजदर 31 मार्च पर्यंतच मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच 31 मार्चपर्यंत कर्ज प्रक्रिया शुल्कही माफ करण्याची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनं (Kotak Mahindra Bank) एक मार्चपासून आपले गृहकर्जाचे व्याजदर 10 आधारभूत अंकांनी (Basis Points) कमी केले असून, त्यांचा व्याजदर हा आता 6.65 टक्के आहे. हा व्याजदर देशात सर्वात कमी असल्याचा दावा बँकेनं केला आहे. व्याजदरातील ही सवलत फक्त 31 मार्चपर्यंत मिळणार असून, कर्ज घेणाऱ्यांचा क्रेडीट स्कोअर (Credit Score) आणि लोन टू व्हॅल्यू (Loan to Value) गुणोत्तराशी (ratio) व्याजदर जोडलेले असल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी हे काम करणं फायद्याचं, कमी व्याजदरात मिळवता येईल कर्ज

त्याशिवाय देशातील अनेक महत्त्वपूर्ण बँकांनीही आपले व्याजदर कमी केले आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांचा समावेश आहे.

अशा दहा बँकाच्या गृहकर्जावरील व्याजदराविषयी  

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)  - 6.65 टक्के

भारतीय स्टेट बँक ( state Bank of India)  - 6.70 टक्के

सिटी बँक ( city bank) - 6.75 टक्के

एचडीएफसी बँक (HDFC Bank) - 6.80 टक्के

युनियन बँक (Union Bank) - 6.80 टक्के

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) - 6.80 टक्के

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) - 6.85 टक्के

बँक ऑफ इंडिया ( Bank Of India ) - 6.85 टक्के

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank ) - 6.90 टक्के

आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank ) - 6.90 टक्के

हे वाचा - शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी हे काम करणं फायद्याचं, कमी व्याजदरात मिळवता येईल कर्ज

गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्यानं घर घेण्यासाठी इच्छुक लोकांना दिलासा मिळाला आहे. गृहकर्ज स्वस्त झाल्यानं गृह खरेदीदारांना प्रोत्साहन मिळेल आणि गृहखरेदीला चालना मिळेल, पर्यायानं कोरोना संकटामुळे थंडावलेल्या घरांच्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण होईल याचा फायदा बांधकाम व्यवसायाला होईल,असा विश्वास व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Home Loan, Loan, Money, Rate of interest, SBI, Sbi home loan