जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI ची सुपरहिट स्कीम! डबल होतील तुमचे पैसे, मिळेल भरपूर रिटर्न

SBI ची सुपरहिट स्कीम! डबल होतील तुमचे पैसे, मिळेल भरपूर रिटर्न

एसबीआय बँक

एसबीआय बँक

SBI Scheme: गुंतवणुकीवर कोणतीही रिस्क घ्यायची नाही आणि गॅरंटीड रिटर्न हवे आहे का? SBI ची ‘SBI We-care’ ही अशीच एक योजना आहे. या योजनेत गुंतवणुकीचे फायदे, तसेच ही योजना किती वेळात तुमचे पैसे दुप्पट करू शकते हे जाणून घेऊ या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

SBI Scheme: तुमच्याकडे काही अतिरिक्त पैसे पडून असतील आणि तुम्हाला ते सुरक्षित ठिकाणी आणि गॅरंटीड रिटर्नसाठी ठेवायचे असतील, तर सरकारी बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणे हा एक योग्य निर्णय असू शकतो. ज्या लोकांना गुंतवणुकीवर कोणतीही रिस्क घ्यायची नाही त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसमधील फिक्स्ड डिपॉझिट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी बँका हा गुंतवणूकदारांसाठी एक चांगला ऑप्शन आहे. या गुंतवणुकीतून त्यांना त्यांच्या पैशांवर ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर रिटर्न मिळेल. SBI ची “SBI We-care” ही अशीच एक योजना आहे. या योजनेत गुंतवणुकीचे फायदे, तसेच ही योजना किती वेळात तुमचे पैसे दुप्पट करू शकते हे जाणून घेऊ या. सरकारी बँकेची ही स्किम स्पेशल टर्म डिपॉझिट स्किम आहे. जी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाते. यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या टर्म डिपॉझिटवर वरुनही व्याज देखील मिळते म्हणजेच डबल फायदा. या योजनेची काही खास वैशिष्ट्ये - हे एक डोमेस्टिक टर्म डिपॉझिट आहे. ज्यामध्ये तुम्ही किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणूक करू शकता. - यावर योजनेअंतर्गत 7.50% दराने व्याज मिळत आहे. यामध्ये कार्ड रेटवर 30bps अतिरिक्त प्रीमियम वेगळा दिला जातोय. - तुम्हाला मॅच्युरिटीवर व्याज मिळते. यावर तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! थेट खिशावर होणार परिणाम पैसे दुप्पट कधी होणार? जर तुम्ही या योजनेत 5 लाखांची गुंतवणूक 10 वर्षांसाठी ठेवली तर तुम्हाला दुप्पट रक्कम मिळेल. पाहा कसं आहे कॅल्क्युलेशन तुमची एकूण गुंतवणूक- 5 लाख रेट ऑफ इंटरेस्ट - 7.50% टाइम पीरियड - 10 एकूण गुंतवणूक अमाउंट - 5 लाख अंदाजे रिटर्न - 5,51,175 एकूण व्हॅल्यू - 10,51,175 SBI vs Post Office FD: एसबीआय की पोस्ट ऑफिस? कुठे एफडी केली तर होईल जास्त फायदा? SBI Retail Domestic Term Deposits Calculator जर तुम्ही SBI We Care चा लाभ काढून टाकला आणि सामान्य गुंतवणूकदारासाठी टर्म डिपॉझिटचा रेट पाहिला, तर बँक सध्या 6.5% दराने व्याज देत आहे. या प्रकरणात तुम्हाला किती रिटर्न मिळेल ते पहा- तुमची एकूण गुंतवणूक- 5 लाख व्याज दर - 6.50% कालावधी - 10 एकूण गुंतवणूक अमाउंट - 5 लाख अंदाजे रिटर्न - 4,52,779 एकूण व्हॅल्यू - 9,52,779 ही गणना तुम्हाला संपूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीसाठी 7.5% आणि 6.5% दराने व्याज मिळेल या गृहीतकेवर आधारित आहे. मात्र या 10 वर्षांमध्ये बँक त्यांचे व्याजदर कमी-जास्त देखील करु शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात