मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Be Like Binod : ऑनलाइन फ्रॉडबाबत SBIचा हटके अलर्ट, ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

Be Like Binod : ऑनलाइन फ्रॉडबाबत SBIचा हटके अलर्ट, ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

सध्या सोशल मीडियावर बिनोद (Binod) या नावावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकजण याबाबत चर्चा करत आहेत. देशभरातील मोठमोठ्या ब्रँड्सनी याबाबत सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर बिनोद (Binod) या नावावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकजण याबाबत चर्चा करत आहेत. देशभरातील मोठमोठ्या ब्रँड्सनी याबाबत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर बिनोद खूप प्रसिद्ध होत आहे. काहीजण तर कारण नसताना देखील 'बिनोद' अशी कमेंट किंवा असा मेसेज लिहून पाठवत आहेत. दरम्यान एसबीआयने देखील सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या बिनोदचा वापर करत ग्राहकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी मेसेज केला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India SBI) ऑनलाइन सुरक्षेबाबत भाष्य करताना 'Be Like Binod'चे ट्वीट केले आहे. एसबीआयने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जर सर्वजण बिनोदसारखे वागले तर कमी फ्रॉड रिपोर्ट येतील. (हे वाचा-कोरोनाचा मोठा फटका! यावर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार केवळ एवढीच वाढ) पेटीएमसारख्या (PayTm) कंपनीने देखील काही वेळासाठी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलचे नाव बदलून 'बिनोद' ठेवले होते. गब्बर सिंह नावाच्या एका युजरने ट्वीट करत पेटीएमने नाव बदलून बिनोद ठेवावे अशी विनंती केली होती. त्यानंतर या 'बिनोद'ला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. मुंबई पोलिसांनी देखील पासवर्ड संदर्भात अलर्ट करण्यासाठी 'बिनोद' या ट्रेंडचा वापर केला होता. काय आहे 'बिनोद' ट्रेंड? दरम्यान बिनोद हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागे एक रंजक कहाणी आहे. बिनोद थारू नावाची एक व्यक्ती आहे, जो YouTube व्हिडीओंच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करताना केवळ त्याचे नाव 'बिनोद' अशी कमेंट करतो. (हे वाचा-मोठी बातमी! सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या 7 वर्षांमधील सर्वात जास्त घसरण) यानंतर स्ले पॉईंट नावाच्या एका चॅनेलने Why Indian Comments Section is Garbage या नावाने 15 जुलै रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये 'बिनोद' ची गंमत करण्यात आली होती. त्यानंतर मात्र बिनोदला सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी मिळाली आहे.
First published:

Tags: SBI

पुढील बातम्या