कोरोनाचा मोठा फटका! यावर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार केवळ एवढीच वाढ

कोरोनाचा मोठा फटका! यावर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार केवळ एवढीच वाढ

भारतीय व्यावसायिकांच्या (Indian Professional) पगारवाढीवर यावर्षी कोव्हिड-19 (COVID-19) चे संकट आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की जरी भारतीय व्यावसायिकांच्या पगारामध्ये वाढ झाली तरी ती अत्यंत कमी असेल

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : भारतीय व्यावसायिकांच्या (Indian Professional) पगारवाढीवर यावर्षी कोव्हिड-19 (COVID-19) चे संकट आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की जरी भारतीय व्यावसायिकांच्या पगारामध्ये वाढ झाली तरी ती अत्यंत कमी असेल. या व्यतिरिक्त काही कंपन्या पगारामध्ये अजिबात वाढ करणार नाहीत तर काही इतर कर्मचार्‍यांच्या पगारावर कपात करतील. तथापि, विशेष कौशल्य असलेल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 15 टक्के किंवा त्याहून अधिक वाढ होऊ शकते.

टीमलीजच्या नोकरी आणि पगारासंदर्भातील प्रायमर अहवालानुसार (TeamLease Jobs & Salaries Primer Report 2020) कोरोनामुळे ना केवळ रोजगार प्रभावित झाला आहे पण यामुळे भारतीय उद्योगांकडून त्यांच्या कर्मचाऱ्याना पुरस्कृत करण्याची पद्धत देखील बदलली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, विभिन्न क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक उद्योजक सर्वाधिक कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15 टक्क्यापेक्षा जास्त पगारवाढ देत आहेत. विविध क्षेत्रांत आणि शहरात पगारवाढ 4.26 टक्के (कमीतकमी) ते 11.22 टक्के (जास्तीत जास्त) आहे.

(हे वाचा-मोठी बातमी! सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या 7 वर्षांमधील सर्वात जास्त घसरण)

टीमलीज सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यास घाबरत आहेत. मात्र याचबरोबर त्या अधिक क्षमता आणि कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत देखील करत आहेत. वास्तविकपणे अशाप्रकारे अधिक कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी सध्या वाढली आहे.

(हे वाचा-नोकरी करण्याआधी तुमची मुलं होतील करोडपती! वाचा काय आहे योजना)

विश्लेषणानुसार, यावर्षी पगारामध्ये वाढ दिसून येणारे प्रोफाइल्स म्हणजे बीएफएसआयमध्ये हडूप डेव्हलपर, शैक्षणिक सेवांमध्ये कार्यरत अ‍ॅनिमेटर्स, औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील कलेक्शन ऑफिसर आणि माहिती तंत्रज्ञान व ज्ञान सेवांमध्ये संबद्ध व डिजिटल मार्केटिंग प्रमुख इ. हे आहेत. या अहवालात असे देखील म्हटले आहे की, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून सातत्याने महत्त्वपूर्ण काम करणारे कर्मचारी असणाऱ्या क्षेत्रांना देखील फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्स, माहिती तंत्रज्ञान आणि ज्ञान सेवांचा समावेश आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 12, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading