बायकोचं ATM कार्ड वापरताय तर आधीच व्हा सावधान! वाचा काय आहे नियम

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI च्या मते डेबिट कार्ड दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. अगदी कुटुंबातील सदस्याला देखील नाही. एवढेच नव्हे तर नियमानुसार पती-पत्नीने देखील एकमेकांना त्यांचे एटीएम कार्ड वापरण्यास देऊ शकत नाहीत.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI च्या मते डेबिट कार्ड दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. अगदी कुटुंबातील सदस्याला देखील नाही. एवढेच नव्हे तर नियमानुसार पती-पत्नीने देखील एकमेकांना त्यांचे एटीएम कार्ड वापरण्यास देऊ शकत नाहीत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर: तुम्ही पैसे काढण्यासाठी तुमचे एटीएम कार्ड मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला देता का? असं करणं तुम्हाला महाग पडू शकते. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI च्या मते डेबिट कार्ड दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. एटीएम कार्ड नॉन ट्रान्सफरेबल असते. अगदी कुटुंबातील सदस्याला देखील नाही. एवढेच नव्हे तर नियमानुसार पती-पत्नीने देखील एकमेकांना त्यांचे एटीएम कार्ड वापरण्यास देऊ शकत नाहीत. असे करणे सुरक्षा नियमांच्या विरोधात आहे. भविष्यात होणाऱ्या नुकसानापासून वाचायचे असेल तर एटीएमचा वापर मोठ्या सावधानतेने करणे आवश्यक आहे. तुमचा पिन न शेअर करणे, खात्याची माहिती किंवा कार्डबाबतची माहीती न देणे इ. हे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. या गोष्टी अजिबात करू नका -कार्डाच्या मागे तुमचा पिन नंबर लिहू नका -अनोळखी व्यक्तींकडून एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी मदत घेऊ नका -कोणत्याही व्यक्तीला तुमचा पिन क्रमांक सांगू नका. बँक कर्मचारी किंवा कुटुंबातील सदस्यांना ही माहिती देऊ नका (हे वाचा-कोट्यवधी कर्जदारांना मिळणार दिलासा? 5 नोव्हेंबरला SC मध्ये पुढील सुनावणी) -घाई-गडबडीत कोणताही व्यवहार करू नका, पेमेंट करतेवेळी पूर्ण लक्ष त्यावर असूद्या -ट्रान्झॅक्शन करताना मोबाइलवर बोलणं टाळा व्यवहार करताना बाळगा सावधानता -एटीएम ट्रान्झॅक्शन दरम्यान पूर्णपणे प्रायव्हसी ठेवा. याची खात्री करुन घ्या की पिन टाकताना तुमच्या आजुबाजूला कुणी नाही आहे. -ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर मशिन स्क्रीनवर वेलकम स्क्रीन आल्याशिवाय एटीएम रुममधून बाहेर पडू नका -तुमच्या चालू नंबर बँकेमध्ये रजिस्टर्ड करा. त्यामुळे सर्व ट्रान्झॅक्शनबाबत तुम्हाला अलर्ट मिळेल -शॉपिंग केल्यानंतर संबंधित मर्चंटकडून कार्ड घेण्यास विसरू नका (हे वाचा-या खाजगी बँकांच्या ग्राहकांना मोठा झटका! पैसे भरण्यासाठीही आकारणार शुल्क) -एटीएममध्ये जर कोणते एक्स्ट्रा डिव्हाइस लावण्यात आले असेल तर त्यावर लक्ष असूद्या -एटीएम कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास बँकेशी संपर्क करा -बँकेकडून येणारे ट्रान्झॅक्शन अलर्ट आणि बँक स्टेटमेंट नेहमी तपासा -एटीएम ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला पैसे मिळाले नाहीत पण खात्यातून पैसे वजा झाले तर त्वरित बँकेशी संपर्क करा -कोणतेही ट्रान्झॅक्शन केल्यास मोबाइलमध्ये आलेला मेसेज तपासा तुम्ही 3 मार्गांनी कार्ड ब्लॉक करू शकता 1.कॉलच्या माध्यमातून SBI डेबिट/ATM कार्ड ब्लॉक करण्यासाठी टोल फ्री नंबर 1800-11-22-11, 1800-425-3800 किंवा 080-080-26599990 यावर संपर्क करावा लागेल. या कॉलवर मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून ग्राहकांना कार्ड ब्लॉक करता येईल (हे वाचा-दिवाळीत दागिन्यांव्यतिरिक्त करा सोन्यामध्ये गुंतवणूक, दरवर्षी मिळेल मिळेल फायदा) 2. SBI Quick App च्या साहाय्याने ग्राहकांना कार्ड ब्लॉक करता येईल 3. SMS च्या माध्यमातून कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला ‘BLOCK<space>कार्डवरील शेवटचे 4 डिजिट’ लिहून 567676 या क्रमांकावर पाठवावे लागतील. रजिस्टर्ड क्रमांकावरूनच तुम्ही हा मेसेज करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: