या खाजगी बँकांच्या ग्राहकांना मोठा झटका! पैसे भरण्यासाठीही आकारणार शुल्क

या खाजगी बँकांच्या ग्राहकांना मोठा झटका! पैसे भरण्यासाठीही आकारणार शुल्क

खाजगी क्षेत्रातील ICICI आणि Axis बँकेने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आता नॉन-बिझनेस तासांमध्ये आणि सुट्ट्यांच्या दिवशी कॅश रिसायकलर आणि कॅश डिपॉझिट मशिनमधून रक्कम भरण्यासाठी फी द्यावी लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : खासगी क्षेत्रातील बँका आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि अॅक्सिस बँकेने (Axis Bank) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे की, आतापासून Non-Business Hours मध्ये आणि सुट्ट्यांच्या दिवशी कॅश रिसायकलर आणि कॅश डिपॉझिट मशिनमधून पैसे जमा करण्यासाठी फी द्यावी लागेल. CNBC TV च्या रिपोर्टनुसार जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी किंवा बँकेच्या वेळे व्यतिरिक्त कॅश रिसायकलर किंवा डिपॉझिट मशिनचा वापर केला तर ग्राहकांना या सेवेसाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

बँकेच्या  नोटिफिकेशननुसार ICICI बँक सुट्ट्यांच्या दिवशी आणि कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत ग्राहकांकडून सुविधा शुल्काच्या रुपात 50 रुपये घेईल.

या खात्यांवर नाही आकारले जाणार शुल्क

CNBC TVच्या अहवालानुसार बँकेने असे सांगितले आहे की, ज्येष्ठ नागरिक, बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट, जनधन खाती, विद्यार्थी खाती आणि दिव्यांग तसंच अंध व्यक्तीसाठी असणारी बँक खाती, या खात्यांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

(हे वाचा-दिवाळीत दागिन्यांव्यतिरिक्त करा सोन्यामध्ये गुंतवणूक, दरवर्षी मिळेल मिळेल फायदा)

अहवालानुसार जर तुम्ही एका महिन्यात एकाच ट्रान्झॅक्शनद्वारे किंवा एकापेक्षा अधिक ट्रान्सझॅक्शनद्वारे कॅश एक्सेप्टर/रिसायकलर मशिनमधून 10 हजारांपेक्षा अधिक पैसे भरले, तरी देखील बँकांकडून त्यावर सुविधा शुल्क आकारले जाईल.

Axis बँकेने ऑगस्टमध्ये लागू केला हा नियम

या वर्षाच्या सुरूवातीस, अ‍ॅक्सिस बँकेने बँकिंगच्या वेळेनंतर आणि राष्ट्रीय तसंच बँकेच्या सुट्यांच्या दिवशी रोख जमा व्यवहारावर 50 रुपये सुविधा शुल्क आकारण्यास सुरवात केली होती. सुविधा सुविधा 1 ऑगस्टपासून लागू झाली.

(हे वाचा-ATM मधून पैसे काढा कार्ड किंवा मोबाइलशिवाय! फिंगरप्रिंट असं करेल काम)

त्याचप्रमाणे बँकेतून 3 वेळा मोफत पैसे काढता येतील त्यानंतरच्या विड्रालवर 150 रुपये शुल्क आकारण्यात येईल, अशी देखील माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे एका महिन्यात तीन वेळा पैसे डिपॉझिट करणे मोफत असेल, त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 40 रुपये आकारले जातील.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 3, 2020, 10:31 AM IST
Tags: money

ताज्या बातम्या