SBI ने कोट्यवधी ग्राहकांना केलं सावधान! कुणाला 'ही' माहिती दिली असेल तर होईल लाखोंचं नुकसान

SBI ने कोट्यवधी ग्राहकांना केलं सावधान! कुणाला 'ही' माहिती दिली असेल तर होईल लाखोंचं नुकसान

देशातील सर्वात मोठी सरकारी सरकारी बँक (State Bank of India) ने त्यांच्या 42 कोटी ग्राहकांना सावधान केले आहे. देशभरात बँकिंग फ्रॉडची (Banking Fraud) प्रकरणं वाढत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (SBI State Bank of India) ने देशातील 42 कोटी ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. देशभरात बँकिंग फ्रॉडच्या (Banking Fraud) घटना वाढल्या आहेत. अशावेळी ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती कुणाबरोबरही शेअर करणं धोक्याचं आहे. ही माहिती तुम्ही तुमच्याजवळच ठेवणं आवश्यक आहे. एसबीआयने अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय जर एखाद्या व्यक्तीबरोबर अशी कोणतीही फसवणुकीची घटना घडली तर ते सायबर क्राइम रिपोर्ट करू शकतात.

एसबीआयने यावेळी ट्वीट करताना एका काल्पनिक व्यक्तीचं उदाहरण देऊन ग्राहकांना सावधान केलं आहे. या काल्पनिक व्यक्तीला एसबीआयने 'थिंकेश्वर' असं नाव दिलं आहे. SBI ने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'श्री. थिंकेश्वर त्यांची वैयक्तिक माहिती खाजगी ठेवतात. कुणाबरोबरही कोणतीही माहिती शेअर करताना ते दोनदा विचार करतात'. या ट्वीटमध्ये SBI ने सायबर क्राइमबाबत कुठे तक्रार करायची याबाबत देखील माहिती दिली आहे.

कुणालाही देऊ नका तुमची ही माहिती

एसबीआयच्या मते तुम्ही कुणालाही तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. असं केल्यास तुमचं खातं रिकामं होण्याची भीती आहे. बँकेने असं म्हटलं आहे की, पॅन (PAN) डिटेल्स, INB क्रिडेन्शियल्स, मोबाइल नंबर, यूपीआय पिन (UPI Pin), एटीएम कार्ड नंबर (ATM Card No.), एटीएम पिन (ATM Pin) आणि यूपीआई वीपीए (UPI VPA) कुणाबरोबरही शेअर करू नका.

(हे वाचा-आधार कार्डच्या माध्यमातून 10 मिनिटांमध्ये बनवा PAN Card, वाचा काय आहे प्रक्रिया)

काही वेळा थेट फोन करूनही ग्राहकांना लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात घ्या, बँकेकडून किंवा बँक अधिकाऱ्यांकडून तुमचे बँकिंग डिटेल्स किंवा इतर वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी फोन केला जात नाही. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या भामट्यांबरोबर ओटीपी, डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर, या कार्डांवरील सीव्हीव्ही, तुमचा एटीएम पिन, इंटरनेट बँकिंग पासवर्ड कधीच शेअर करू नका.

टोल फ्री क्रमांकावरून मिळवा योग्य माहिती

अनेकदा ग्राहक गुगल सर्च करून त्याठिकाणी आलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करतात. काही वेळा हा नंबर चुकीचा असू शकतो. ज्यामुळे तुम्ही फसणुकीचे बळी ठरू शकता. याविषयीही इशारा देत बँकेने काही टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. कोणताही एसबीआय ग्राहक 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून बँकेविषयी हवी ती माहिती मिळवू शकतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 17, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या