नवी दिल्ली, 13 मे, डि. पी. सतीश : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता सत्ता कुणाची येणार? 23 मे रोजी निकाल काय लागणार? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, आता तडजोडीच्या राजकारणाला देखील सुरूवात झाली असून त्यादृष्टीनं अनेक नेत्यांनी पावलं देखील उचलायला सुरूवात केली आहे. भाजपनं आम्ही पुन्हा सत्ता स्थापन करू आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान भाजप किंवा काँग्रेसला एकहाती सत्ता न मिळाल्यास इतर पक्षांनी आपली राजकीय समीकरणं तयार केली आहेत. त्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव आहे ते TRSचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांचं. दिल्लीतील राजकारणात आता चंद्रशेखर राव यांचं नाव देखील चर्चिलं जात आहे. काय आहे के. चंद्रशेखर राव यांचा प्लॅन 23 मे रोजी लागलेल्या निकालानंतर भाजपला एकहाती सत्ता न मिळाल्यास चंद्रशेखर राव इतर पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करतील. त्याकरता त्यांनी इतर पक्षांशी बोलणी देखील सुरू केली आहेत. के. चंद्रशेखर राव पंतप्रधान होतील अथवा नाही हे आत्ता सांगणं कठीण असलं तरी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ममता बॅनर्जींचं अमित शहांना ‘टशन’; रॅलीची परवानगी केली रद्द भाजपला समर्थन देणार? भाजपला बहुमत न मिळाल्यास के. चंद्रशेखर राव भाजपला समर्थन देऊ शकतात अशी चर्चा देखील सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. लोकसभेच्या झंझावाती सभांनंतर राज ‘बॅक टू अॅक्शन’ खरंच TRSची ताकद आहे? मागील काही वर्षांमध्ये TRSची ताकद वाढताना दिसत आहे. 1999 आणि 2009ची तुलना करता त्यातील फरक दिसून येतो. 1999मध्ये त्यांनी टीडीपीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. पण, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नव्हतं. के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचं उपसभापतीपद चंद्रबाबु नायडू यांनी दिलं होतं. त्यानंतर एका वर्षानंतर के. चंद्रशेखर राव यांनी टीडीपीशी फारकत घेत तेलंगना राष्ट्र समितीची स्थापना केली. 2004मध्ये TRSला पाच जागांवरती विजय मिळाला होता. त्यानंतर त्यांना UPAमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. 2009मध्ये निकालांच्या पूर्वी त्यांनी NDAचा हात धरला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण, TRSला केवळ 2 जागी विजय मिळाला. काँग्रेसनं सत्ता स्थापन केली. तर, आंध्रप्रदेशमध्ये YSR रेड्डी यांच्या हाती सत्ता आली. पण, सर्व चढउतार पाहिल्यानंतर के. चंद्रशेखर राव पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात यायला तयार झाले आहेत. SPECIAL REPORT: वृद्ध आई-वडिलांमुळे लग्न जमेना, तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







