नवी दिल्ली, 14 जानेवारी : देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या State Bank of India ने एक निर्णय घेतला आहे. तुमचं SBI मध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बँकेने ठराविक मुदतीच्या ठेवी म्हणजेच FD वरच्या व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. यामुळे ग्राहकांचं नुकसान होणार आहे. लाइव्ह मिंटमध्ये आलेल्या बातमीनुसार, SBI तर्फे जाहीर झालेले FD चे व्याजदर 10 जानेवारीपासून लागू होतील. बँकेने एक वर्ष ते 10 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या लाँग टर्म डिपॉझिटच्या FD च्या दरात कपात केली आहे. 7 दिवस ते 1 वर्षांपर्यंतच्या FD बद्दल काहीही बदल करण्यात आले नाही. SBI एफडीचे नवे व्याजदर 7 ते 45 दिवसांची FD : SBI ने दिलेल्या माहितीनुसार 7 ते 45 दिवसांच्या FD चे नवे व्याजदर 4.5 टक्के आहेत. 46 दिवस ते 179 दिवसांपर्यंतची FD : या एफडीसाठी 5.50 टक्के व्याज मिळेल. 180 दिवस ते 210 दिवसांची FD : या FD वर 6 टक्के व्याज होतं. 10 सप्टेंबरपासून हा व्याजदर 0.58 टक्के आला. (हेही वाचा : तुमच्या SBI खात्यात ही माहिती अपडेट करा नाहीतर पैसे काढणं होणार कठीण) 211 दिवस ते 1 वर्षांपर्यतची FD : यावर आता 5.80 टक्के व्याज मिळेल. 1 वर्ष ते 2 वर्षांची FD : यावर 6. 10 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवे व्याजदर 7 ते 45 दिवसांची FD : SBI 7 दिवसांपासून 45 दिवसांसाठी FD वर 5 टक्के व्याज देईल. 46 दिवस ते 179 दिवस : SBI 46 ते 179 दिवसांसाठी FD वर 6 टक्के व्याज देईल. 180 दिवस ते 210 दिवस : या FD साठी बँक 6. 30 टक्के व्याज देईल. FD वरचे व्याजदर घटवल्याने ग्राहकांचं नुकसान होणार आहे पण SBI मधल्या मुदत ठेवी सुरक्षित आहेत. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करण्याचं कारण नाही. =========================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.