मुंबई, 22 डिसेंबर: ऑटोमोबाइल कंपनी जनरल मोटर्स (General Motors) त्यांचा भारतातील शेवटचा प्लँट देखील बंद करणार आहे. कंपनीकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामागे भारत आणि चीनमधील वाढता तणाव (India and China conflict) हे कारण समोर येते आहे. हा प्लँट 25 डिसेंबरला ख्रिसमस दिवशीच बंद होणार आहे. महाराष्ट्रातील (Talegaon) तळेगावमध्ये हा प्लँट आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर 1800 कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. 1996 मध्ये जीएमकडून महाराष्ट्रात या प्लँटची सुरुवात करण्यात आली होती. 1800 कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार तळेगाव स्थित जनरल मोटर्स (General Motors) च्या या प्लँटमध्ये जवळपास 1800 कर्मचारी काम करत आहेत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनरल मोटर्सने हा प्लँट विकरण्यासाठी चीन मधील कंपनी ग्रेट वॉल मोटर्सबरोबर जानेवारीमध्ये करार केला होता. मात्र भारत सरकारने या करारास मंजुरी दिली नाही. कंपनीला अशी आशा होती की, या वर्षाच्या अखेरपर्यंत हे डील पूर्ण होईल. मात्र भारत आणि चीनमधील वाढत्या तणामुळे अद्याप सरकारने याकरता परवानगी दिली नाही आहे. (हे वाचा- 1 जानेवारीपासून बदलणार हे 10 महत्त्वाचे नियम, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम ) सरकारने गुंतवणुकीसाठी बनवले कठोर नियम लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर भारताने चीनसह अन्य शेजारी देशांबरोबर करार करण्यासाठी गुंतवणुकीचे नियम कठोर केले आहेत. सरकारने या सर्व गुंतवणुकींची आधी तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याचे उद्दिष्ट्य चीनमधून होणारी गुंतवणूक रोखणे हा होता. सरकारने अनेक सेक्टर्समध्ये चिनी सामानावर बंदी आणली आहे. चीनबरोबरच्या तणावानंतर महाराष्ट्र सरकारने देखील जीएम-ग्रेट वॉल आणि अन्य दोन करार थांबवले आहेत. (हे वाचा- 9 दिवसांमध्ये ITR नाही फाइल केला तर 10000 रुपये दंड, वाचा सविस्तर ) 2017 मध्ये गुजरात स्थित प्लँटची केली होती विक्री जनरल मोटर्सने याआधी 2017 मध्ये त्यांचा गुजरातच्या हलोल स्थित एक प्लँट देखील चीनमधील कंपनी SAIC ला विकला होता. हा प्लँट MG मोटर्सकडून वापरला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत बोलताना कंपनीने असं म्हटलं आहे की, त्यांना कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजीआहे. कंपनीच्या मते ते पुढील महिन्यापर्यंत कर्मचाऱ्यांना पेमेंट करणार आहे. या प्लँटमध्ये तयार होणाऱ्या Chevrolet Beat ला मुख्यत: मेक्सिकोमध्ये निर्यात केले जात असे, जी निर्यात आता बंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.