जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI नं वाढवले होम लोनचे दर, वाचा तुमच्या EMI वर काय होणार परिणाम?

SBI नं वाढवले होम लोनचे दर, वाचा तुमच्या EMI वर काय होणार परिणाम?

SBI नं वाढवले होम लोनचे दर, वाचा तुमच्या EMI वर काय होणार परिणाम?

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं होम लोनमधील (SBI Home Loan) किमान व्याज दरामध्ये वाढ केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं होम लोनमधील (SBI Home Loan) किमान व्याज दरामध्ये वाढ केली आहे. बुधवार 15 जूनपासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. बँकेनं मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट (MCLR) 0.20 टक्के वाढवला असून त्याची देखील 15 जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्स वाढ केल्यानंतर स्टेट बँकेनं हा निर्णय घेतला आहे. काय होणार बदल? स्टेट बँकेनं होम लोनचा किमान दर 7.55 टक्के करण्यात आला आहे. याचाच अर्थ 7.55 टक्के दरानं होम लोन मिळेल. त्याचबरोबर ज्यांचा  सीआईबीआईएल स्‍कोर (CIBIL Score) 800 पेक्षा जास्त असेल त्यांना 7.65 टक्के वार्षिक दरानं लोन मिळेल. ज्यांचा सिबल स्कोर 700-749 आहे त्यांना 7.75 आणि 650-699 स्कोर असलेल्या ग्राहकांना 7.85 टक्के दरानं एसबीआय होम लोन देईल. त्याचबरोबर ज्यांचा सिबल स्कोर 550 ते 649 आहे त्यांना 8.05 दरानं व्याज द्यावं लागेल. बँकेनं एक वर्षाचा बेंचमार्क एमसीएलआरलला 7.20 टक्क्यांवरून 7.40 वाढ केली आहे. जवळपास सर्व ग्राहकांची लोन (उदा. ऑटो, होम, पर्सनल लोन) एमसीएलआरशी लिंक आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये बदल झाल्यास यामध्ये बदल अटळ आहे. एसबीआयनं रेपो रेट लिंक्ड लँडिंग रेट  (RLLR) 15 जून पासून वाढवला आहे. यापूर्वी आरएलएलआरचा दर 6.65 टक्के आहे. तो आता वाढवून 7.15 टक्के केला आहे. वाढलेले दर 15 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. Financial Tips: CIBIL स्कोअर कमी आहेत? तरीही लोन घेण्यासाठी काय कराल? FD व्याज दरामध्येही वाढ एसबीआयनं 14 जूनपासून दोन कोटी रूपयांपेक्षा कमी आणि 211 दिवसांपासून 3 वर्षांपर्यंत मॅच्यूर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरामध्ये वाढ केली आहे. 211 दिवस ते एक वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होणाऱ्या फिक्स डिपॉझिटमधील व्याज दरामध्ये बँकेनं 4.40 टक्क्यांवरून 4.60 टक्के केला आहे. एक वर्षांपासून दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीमध्ये एफडी करणाऱ्या ग्राहकांना यापूर्वी 5.10 टक्के वार्षिक दरानं बँकेकडून व्याज देण्यात येत होते. आता त्यांना 5.30 टक्के व्याज देण्यात येणार आहे. दोन ते तीन वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटसाठी बँकेकडून 5.35 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात