लॉकडाऊनमध्ये 45 मिनिटांत मिळवा 5 लाखांचं कर्ज, 6 महिने EMI नाही! 'या' बॅंकेनं सुरू केली सेवा

लॉकडाऊनमध्ये 45 मिनिटांत मिळवा 5 लाखांचं कर्ज, 6 महिने EMI नाही! 'या' बॅंकेनं सुरू केली सेवा

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ 45 मिनिटांमध्ये 5 लाखांचे कर्ज देण्याची सेवा एका बॅंकेनं सुरू केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : कोरोना विषाणूमुळे देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यामुळं अनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. कोव्हिड-19चा सर्वात जास्त परिणाम हा मध्यमवर्गावर होत आहे. यामुळेच लोकांच्या हातात खर्च करण्यासाठीही पैसे नाही आहेत. काही लोकांचे जगणेही कठीण झाले आहे, या सगळ्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थकारणावरही दिसून येत आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल तर देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (SBI) तुम्हाला मदत करू शकेल. SBI फारच कमी व्याज दरावर 5 लाख रुपयांचे कर्ज अत्यंत अल्पावधीत देत आहे. खास गोष्ट म्हणजे आपण घरी बसून या कर्जासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला केवळ 45 मिनिटांत कर्ज मिळेल.

वाचा-आज करोडो खात्यांमध्ये सरकारने पाठवले पैसे, जाणून घ्या तुम्हाला कधी मिळणार रक्कम?

6 महिने EMI ही भरावा लागणार नाही

कोरोनाव्हायरसमध्ये (Coronavirus Pandemic) लोकांना मदत करण्यासाठी SBIने एक खास सेवा आणली आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्या सहा महिन्यांसाठी समान मासिक हप्ताही (EMI) देण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की जर तुम्ही हे कर्ज मे महिन्यात SBIकडून घेत असाल तर तुम्हाला त्यासाठी ऑक्टोबरपर्यंत कोणताही EMI भरावा लागणार नाही. कर्ज घेतल्यानंतर 6 महिन्यांनंतर तुमची EMI सुरू होईल.

वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' स्कीममुळे लोकांचे वाचले 300 कोटी

असेा असेल व्याज दर 

आपण कोणत्याही वेळी SBIकडून वैयक्तिक आपत्कालीन कर्ज घेऊ शकता. या कर्जासाठी एसबीआय तुम्हाला 7.25 टक्के दराने व्याज आकारेल. हे बर्‍याच बँकांकडून घेतलेल्या व्याजापेक्षा कमी आहे.

वाचा-CKP बँकेच्या 99.2% ठेवीदारांना मिळणार पूर्ण पैसे,5 लाखपर्यंत रक्कम सुरक्षित

आपत्कालीन कर्जासाठी असा करा अर्ज

>> तुम्ही घरात बसून कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून PAPL टाइप करून स्पेस द्या, त्यानंतर तुमच्या अकाउंटनंबरचे शेवटचे 4 आकडे टाइप करा, हा मजकूर 567676वर SMS करा.

>> जर बॅंकेच्या वतीनं तुमची सर्व माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला 4 प्रोसेसमध्ये कर्ज मिळू शकेल.

>> तुम्ही SBIच्या YONO SBI या अॅपच्या माध्यमातूनही कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी अॅपमध्ये असलेल्या Avail Now option वर क्लिक करा.

>> त्यानंतर कर्जाची रक्कम आणि अकाउंट नंबर सिलेक्ट करा.

>> तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP क्रमांक येईल. हा OTP क्रमांका अनिवार्य जागी टाकल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये त्वरित कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published: May 4, 2020, 2:15 PM IST
Tags: bank loan

ताज्या बातम्या