लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' स्कीममुळे लोकांचे वाचले 300 कोटी, असा झाला फायदा

लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' स्कीममुळे लोकांचे वाचले 300 कोटी, असा झाला फायदा

मोदी सरकारच्या या योजनेमुळं लोकांना झाला फायदा. लॉकडाऊनमध्ये वाचले तब्बल 300 कोटी.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे खरेदी आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित अडचणी असूनही पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रानं (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Kendras) एप्रिलमध्ये 52 कोटी रुपयांची विक्री केली. ही माहिती एका अधिकृत निवेदनात दिली आहे. रसायन व खत मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या केंद्रांनी एप्रिल महिन्यात 17 कोटी आणि मार्च 2020 मध्ये 42 कोटींची विक्री केली. निवेदनात म्हटले आहे की यामुळे लोकांची सुमारे 300 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

जनऔषधी केंद्रांमध्ये 50 ते 90 टक्के स्वस्त मिळतात औषधे

जनऔषधी केंद्रांवर सरासरी बाजारभावापेक्षा 50 ते 90 टक्के स्वस्त औषधे उपलब्ध आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान भारती जन जनऔषधी योजनेतून देशातील लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या देशभरात 726 जिल्ह्यात 6 हजार 300हून अधिक जनौषधी केंद्रे आहेत.

वाचा-मोठी बातमी, फेसबुकनंतर आता Jio मध्ये Silver Lake करणार 5,655 कोटींची गुंतवणूक

जनऔषधी केंद्र कसे सुरू करावे?

जनऔषधी केंद्र उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. हे काम ऑनलाईन देखील केले जाऊ शकते. जन औषधी केंद्र उघडण्यात फारसा खर्च येत नाही आणि जो काही खर्च होईल तो सरकार हळू हळू तुम्हाला परत करते. त्याचबरोबर कमिशनही दिले जाते.

वाचा-CKP बँकेच्या 99.2% ठेवीदारांना मिळणार पूर्ण पैसे,5 लाखपर्यंत रक्कम सुरक्षित

तीन गटांमध्ये सुरू करता येतात जनऔषधी केंद्र

पहिल्या गटात कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिका जनऔषधी केंद्र उघडू शकतात. दुसर्‍या प्रकारात ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालये, सोसायट्या व बचतगट जनऔषधी केंद्र उघडू शकतात. तिसर्‍या प्रकारात राज्य सरकारच्या वतीने नामित एजन्सी जनऔषधी केंद्र उघडू शकतात.

वाचा-अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर आणण्यासाठी लागणार वर्षापेक्षा जास्त कालावधी-सर्व्हे

अशी मिळते सरकारची मदत

जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी सरकार 2.5 लाखांपर्यंत मदत करते. औषधांची विक्री केल्यानंतर यातून 20% कमिशन मिळते. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या विक्रीवर 15% इन्सेंटिव्ह स्वतंत्रपणे दिला जातो. इन्सेंटिव्ह कमाल मर्यादा महिन्याला 10 हजार रुपये पर्यंत निश्चित केली गेली आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: May 4, 2020, 10:40 AM IST

ताज्या बातम्या