आज करोडो खात्यांमध्ये मोदी सरकारने पाठवले पैसे, जाणून घ्या तुम्हाला कधी मिळणार रक्कम?

आज करोडो खात्यांमध्ये मोदी सरकारने पाठवले पैसे, जाणून घ्या तुम्हाला कधी मिळणार रक्कम?

केंद्र सरकार गरीब परिवारातील महिलांच्या जनधन खात्यामध्ये (Jan Dhan Account) 3 महिन्यासाठी दर महिना 500 रुपये ट्रान्सफर करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 3 मेनंतर आता 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान गरीब परिवारांचे झाले आहे. या नागरिकांची मदत करण्यासाठी सरकार गरीब परिवारांना गरीब कल्याण पॅकेजनुसार (Pradhan Mantri Garib Kalyan Package) महिल्यांच्या खात्यात 3 महिन्यासाठी दर महिना 500 रुपये ट्रान्सफर करणार आहे. या खांत्यामध्ये जमा होणारी रक्कम ही जनधन खात्याच्या शेवटच्या क्रमांकानुसार केले जाणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजमधून हे पैसे 5 दिवसांमध्ये ट्रान्सफर केले जातील. एप्रिल महिन्यांत 20.5 को़टी महिलांच्या जनधन खात्यात 500-500 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारा दुसरा हप्ता ट्रान्सफर करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये याकरता टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' स्कीममुळे लोकांचे वाचले 300 कोटी

असे आहे टाईम टेबल

जन धन लाभार्थी महिलांना त्यांच्या खाते क्रमांकाच्या आधारे पैसे काढण्याची परवानगी आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या खातेधारकांच्या खाते क्रमांक 0 किंवा 1 असेल त्यांना 4 मे रोजी ही रक्कम ट्रान्सफर करण्यात येईल. तर, 5 मे रोजी 2 आणि 3 अंकी खात्यात, 6 आणि 4 अंकी खात्यात 6 मे रोजी ही रक्कम ट्रान्सफर होईल. 6 आणि 7 अंक असलेल्या महिलांना 8 मे रोजी पैसे मिळतील. तर, ज्या खातेदारांचे अंतिम अंक 8 आणि 9 आहेत त्यांना 11 मे रोजी हे पैसे मिळतील.

वाचा-लॉकडाऊनमध्ये नोकरी जाण्याचा धोका! घरबसल्या या व्यवसायातून करू शकता लाखोंची कमाई

कधी काढू शकता पैसे?

11 मेनंतर सुद्धा तुम्ही हे पैसे काढू शकता. बँकेमध्ये गर्दी कमी व्हावी याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बँकेत जाऊन पैसे काढण्याव्यतिरिक्त तुम्ही जवळच्या एटीएमध्ये जाऊन किंवा बँक मित्राच्या साहाय्याने देखील पैसे काढू शकता. कोणत्याही एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त शूल्क द्यावे लागणार नाही. यासंदर्भात देखील सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत. हे वेळापत्रक केवळ या महिन्याकरता असल्याची माहिती बँकांकडून देण्यात आली आहे.

वाचा-या बँकेत खातं आहे तर मिळणार 5 लाख रूपये! RBI चा मोठा निर्णय

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: May 4, 2020, 11:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या