जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कधी पाहिलं आहे का तरंगणारं ATM? ग्राहकांसाठी SBI ने सुरू केली ही खास सेवा

कधी पाहिलं आहे का तरंगणारं ATM? ग्राहकांसाठी SBI ने सुरू केली ही खास सेवा

SBI Floating ATM

SBI Floating ATM

भारतीय स्टेट बँकेने (SBI) श्रीनगरमधील स्थानिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी डल तलावातील (Floating ATM at Dal Lake) हाऊसबोटवर फ्लोटिंग एटीएम उघडले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) एक नवा उपक्रम पूर्णत्त्वास नेला आहे. बँकेने एक अनोखं एटीएम सुरू केलं आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) श्रीनगरमधील स्थानिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी डल तलावातील (Floating ATM at Dal Lake) हाऊसबोटवर फ्लोटिंग एटीएम उघडले आहे. या फ्लोटिंग एटीएमचे उद्घाटन एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खरे यांनी केले आहे. स्थानिक लोकांव्यतिरिक्त पर्यटकांना रोख उपलब्ध करून देण्यासाठी हे एटीएम महत्त्वाचे ठरेल. दरम्यान तरंगणारं एटीएम हे सध्या या परिसरात आकर्षण ठरत आहे. SBI ने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. SBI ने काय केलं आहे ट्वीट? स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीट करत असं म्हटलं आहे की, स्थानिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी श्रीनगरच्या डल लेकमधील हाऊसबोटवर SBI ने एटीएम सुरू केलं आहे. याचे उद्घाटन एसबीआयच्या अध्यक्षांनी 16 ऑगस्ट रोजी केले होते प्रसिद्ध डल लेकमध्ये उभारण्यात आलेल #FloatingATM दीर्घकालीन गरज पूर्ण करेल आणि श्रीनगरच्या आकर्षणामध्ये या समावेश केला जाईल.

जाहिरात

SBI कडून ग्राहकांच्या सेवेसाठी अनेक योजनांचा विस्तार केला आहे. श्रीनगरमधील ग्राहकांच्या सुविधेसाठी ही एटीएम योजना महत्त्वाची ठरेल. केरळमध्ये देखील आहे फ्लोटिंग एटीएम हे वाचा- SBI Alert! अडथळ्यांशिवाय हव्या असतील बँकिंग सुविधा तर करा हे काम पूर्ण SBI ने सुरू केलेलं हे पहिलं तरंगणारं एटीएम नाही आहे. याआधी State Bank of India ने केरळमध्ये 2004 साठी फ्लोटिंग एटीएमची सुरुवात केली होती. हे फ्लोटिंग एटीएम केरळच्या शीपिंग अँड इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन (KSINC) च्या Jhankar yacht वर उघडण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात