मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: आज 8200 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, चांदीच्या दरात घसरण; वाचा प्रति तोळा गोल्डचा भाव

Gold Price Today: आज 8200 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, चांदीच्या दरात घसरण; वाचा प्रति तोळा गोल्डचा भाव

Gold Price Today: सोन्यामध्ये आज घसरण झाली आहे, तर चांदीच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.

Gold Price Today: सोन्यामध्ये आज घसरण झाली आहे, तर चांदीच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.

Gold Price Today: सोन्यामध्ये आज घसरण झाली आहे, तर चांदीच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: सोन्याच्या दरात (Gold Rates) गुरुवारी देखील घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) ऑक्टोबरमधील सोन्याचे दर आज सकाळी साडेनऊ वाजता 0.09 टक्क्यांनी कमी (Gold Price Today) झाले आहेत. या घसरणीनंतर दर 47,847 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गुरुवारी चांदीच्या दरातंही (Silver Rates) मोठी घसरण पाहायला मिळाली. 5 ऑगस्ट रोजी चांदीच्या दरात (Silver Price Today) झालेल्या घसरणीनंतर दर 0.19 टक्क्यांनी कमी होऊन  67,471 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. स्पॉट गोल्ड  0110 GMT च्या घसरणीनंतर 0.1 टक्क्याने कमी होऊन 1,810.50 डॉलर प्रति औंस झाले आहे. अमेरिकन वायदे बाजारात सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी कमी झाले आहेत, यानंतर दर 1,812.40 डॉलरच्या आसपास बंद झाले आहेत. बुधवारी तीन आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर चांदीचे दर 0.1 टक्क्यांनी कमी होऊन 25.33 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. गेल्या वर्षी सोन्याचे दर ऑगस्टमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. त्या रेकॉर्ड हायपेक्षा सोनं आज 8200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

हे वाचा-ईडीने पाठवली Flipkart ला नोटीस, भरावा लागू शकतो 10000 कोटींचा दंड

महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर

गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते,  देशांतर्गत बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 10 रुपयांच्या घसरणीमुळे 46,950 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 400 रुपयांनी वाढून 68,000 रुपये प्रति किलोवर आहे. मुंबईमध्ये सोन्याचे दर 46,950 रुपये प्रति तोळा आहेत. नवी दिल्लीमध्ये हा दर  47,040 रुपये प्रति तोळा असून चेन्नईत 45,330 रुपये प्रति तोळा दराने सोन्याची विक्री होत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 47,950 रुपये प्रति तोळा आहे.

हे वाचा-हा हिट फॉर्म्यूला वापरुन करा भरघोस कमाई! केवळ 5000 रुपये गुंतवून मिळवा 50000

90,000 रुपये स्तरावर पोहचू शकतात सोन्याचे दर

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सोन्यामध्ये चढउतार जारी आहे. व्हॅक्सिनेशन प्रक्रिया जगभरात सुरू झाल्यानंतर अशाप्रकार चढउतार अधिक प्रमाणात होत आहे. अशावेळी 25 कोटी डॉलरच्या क्वाडरिगा इग्नियो फंड सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला यांचं असं म्हणणं आहे की सोन्याचे दर पुढील 3-5 वर्षात सध्यापेक्षा दुप्पट होतील. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 3000-5000 डॉलर प्रति औंसवर पोहचू शकतात. या अंदाजाने भारतात सोन्याचे दर 90,000 रुपये प्रति तोळाचा स्तर पार करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today