• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ईडीचा Flipkart ला मोठा झटका! दिग्गज ई-कॉमर्स कंपनीला नोटीस, भरावा लागू शकतो 10000 कोटींचा दंड

ईडीचा Flipkart ला मोठा झटका! दिग्गज ई-कॉमर्स कंपनीला नोटीस, भरावा लागू शकतो 10000 कोटींचा दंड

वॉलमार्ट (Walmart) चा मालकी हक्क असणारी देशातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आणि कंपनीच्या संस्थापकांना ईडीकडून मोठा झटका बसला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: वॉलमार्ट (Walmart) चा मालकी हक्क असणारी देशातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी  फ्लिपकार्ट (Flipkart) आणि कंपनीच्या संस्थापकांना ईडीकडून मोठा झटका बसला आहे. ईडीने परदेशी गुंतवणूक कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10000 कोटी रुपये  (1.35 अब्ज डॉलर) ची कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. सूत्रांच्या आणि ईडीच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने रॉयटर्सने याबाबत माहिती दिली आहे. फ्लिपकार्ट आणि कंपनीचे फाउंडर, बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांच्यावर परदेशी गुंतवणूक कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. जुलैमध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (फेमा) सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने या संस्थांवर कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर अशी माहिती दिली आहे की, फ्लिपकार्टने विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आणि संबंधित पक्ष डब्ल्यूएस रिटेल (WS Retail) यांनी त्यांच्या शॉपिंग वेबसाइटवर ग्राहकांना सामानाची विक्री केली, जे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्ट आणि Amazon ची सध्या कथित स्वरुपात परकीय गुंतवणुकीच्या कायद्यानुसार चौकशी केली जात आहे. हे वाचा-हा हिट फॉर्म्यूला वापरुन करा भरघोस कमाई! केवळ 5000 रुपये गुंतवून मिळवा 50000 या नोटीसनुसार, हे प्रकरण 2009 ते 2015 दरम्यानचे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जुलैमध्ये ईडीच्या चेन्नई ऑफिसने फ्लिपकार्ट, कंपनीचे फाउंडर्स सचिन आणि बिन्नी बन्सल यांच्यासह सध्याचे गुंतवणूकदार टायगर ग्लोबलला कारणे दाखवा नोटीस पाठवून असे विचारले होते की त्यांच्यावर 10000 कोटींचा दंड का ठोठावू नये. फ्लिपकार्टच्या एका प्रवक्त्याने अशी माहिती दिली आहे की, कंपनी कायदे आणि नियमांचं पालन करत आहे. त्यांनी असे म्हटले की कंपनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण सहयोग करेल. 90 दिवसात द्यावं लागेल उत्तर आणखी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टला आणि इतर पक्षांना नोटीस बाबत उत्तर देण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. WS Retail ने 2015 च्या अखेरपर्यंत त्यांचे कामकाज बंद केले होते. दरम्यान टायगर ग्लोबलने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शिवाय बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांच्याकडूनही कोणती प्रतिक्रिया आलेली नाही, ईडीनेही या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे वाचा-LPG बुकिंगवर 2700 रुपयांपर्यंत कॅशबॅक, आता बुक करुन नंतर पे करण्याचीही ऑफर वॉलमार्ट ने 2018 मध्ये 16 अब्ज डॉलरमध्ये फ्लिपकार्टमधील सर्वाधिक भागीदारी खरेदी केली होती, हा एक मोठा करार मानला जातो. सचिन बन्सल यांनी त्यांच्याकडील सर्व भागीदारी विकली होती, तर बिन्नी बन्सल यांच्याकडे अद्यापही काही हक्क शिल्लक आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: