जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI Important Notice: आज नाही मिळणार एसबीआयची ही सेवा, वाचा कोणत्या सेवा वापरता येणार?

SBI Important Notice: आज नाही मिळणार एसबीआयची ही सेवा, वाचा कोणत्या सेवा वापरता येणार?

SBI Important Notice: आज नाही मिळणार एसबीआयची ही सेवा, वाचा कोणत्या सेवा वापरता येणार?

SBI Important Notice: जर तुम्ही एसबीआयचे (SBI) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला आज UPI पेमेंट करताना समस्या येऊ शकते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 मार्च: जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक (SBI Customer) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज तुम्हाला UPI पेमेंट करताना समस्या येऊ शकते. बँकेने त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार 14 मार्च रोजी यूपीआय ट्रान्झॅक्शन करताना समस्या येऊ शकते. कारण आज बँक त्यांचे UPI प्लॅटफॉर्म अपडेट करत आहे, जेणेकरून ग्राहकांना चांगली सेवा देता येईल. एसबीआयचे देशभरात 44 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. बँकेने दिले हे पर्याय SBI ने त्यांच्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 14 मार्च रोजी अपग्रेडेशनसाठी एसबीआय कस्टमर्सना बँकेच्या यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात समस्या येऊ शकते. बँकेने आर्थिक व्यवहार करण्यासाठी काही पर्यायही सुचवले आहेत. बँकेने अशी माहिती दिली आहे की, ग्राहक योनो (Yono App), योनो लाइट (Yono Lite App), नेट बँकिंग (SBI Net banking) किंवा एटीएम (ATM) या पर्यायांचा देखील वापर करू शकतात. (हे वाचा- खूशखबर! एका मिनिटाचा VIDEO करून मिळवा पैसे, वाचा काय आहे Facebook चं फीचर ) जेणेकरून आर्थिक व्यवहारात अडचण येणार नाही. बँकेने दिलेल्या माहितीनुसार SBI युजर्स पर्याय म्हणून बँकेच्या अन्य पर्यायांचा देखील वापर करू शकतात. एसबीआयच्या ट्वीटनुसार यूपीआय अपग्रेडेशचा या सेवांवर परिणाम होणार नाही.

जाहिरात

काय आहेत बँकेचे हेल्पलाइन क्रमांक याविषयी अतिरिक्त माहितीकरता ग्राहक टोल फ्री क्रमांक 1800111109 यावर देखील कॉल करू शकतात. किंवा आयव्हीआर क्रमांक 1800-425-3800 / 1800-11-2211 यावर देखील कॉल करू शकता. याशिवाय ग्राहकांना कोणत्या समस्या असतील तर ते https://cms.onlinesbi.sbi.com/cms/ यावर जाऊन तक्रार देखील करू शकतात. ग्राहकांना तक्रार करायची असेल तर ते एसएमएस सुविधेचा देखील वापर करू शकतात. त्याकरता 9223008333 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात