जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! 31 डिसेंबरच्या आधी मिळणार SBI च्या या योजनेचा फायदा

खूशखबर! 31 डिसेंबरच्या आधी मिळणार SBI च्या या योजनेचा फायदा

खूशखबर! 31 डिसेंबरच्या आधी मिळणार SBI च्या या योजनेचा फायदा

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने घरखरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. SBI ने होमलोनवरचे व्याजदर घटवले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 डिसेंबर : देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने घरखरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. SBI ने होमलोनवरचे व्याजदर घटवले आहेत.या नव्या ऑफरनुसार, 31 डिसेंबर 2019 पर्यंत तुम्ही होमलोन घेतलं तर 1 जानेवारी 2020 पासून तुम्हाला 0.25 टक्के कमी व्याज द्यावं लागेल. SBI ने ट्वीट करून याबदद्ल माहिती दिली आहे. बँकेच्या ट्वीटनुसार, SBI होमलोनचे व्याजदर 8.15 टक्क्यांपासून सुरू होतात. पण या ऑफरमध्ये 7.90 टक्के व्याजदराने होमलोन घेता येईल. यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2019 च्या आधी अर्ज करावा लागेल. कर्जाचे कमी व्याजदर 1 जानेवारी 2020 पासून सुरू होतील.

जाहिरात

काही मिनिटांत मंजूर होणार कर्ज SBI च्या ऑफरनुसार जर तुम्ही YONOSBI च्या माध्यमातून 31 डिसेंबरच्या आधी होमलोनसाठी अर्ज केलात तर तुम्हाला लगेच तत्त्वत: मान्यता दिली जाईल. (हेही वाचा : ख्रिसमससाठी सर्वोत्तम गिफ्ट : तुमच्या फिटनेस प्रेमी मित्रासाठी Honor Band 5) बँकेच्या आणखी काही ऑफर्स बँकेने दिलेल्या माहितीनुसार कर्जासाठीची प्रोसेसिंग फी कमी असेल आणि कोणताही हिडन चार्ज नसेल. त्याचबरोबर कर्जाच्या प्रिपेमेंटवर पेनल्टीही लागणार नाही. ===============================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , SBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात