SBI अलर्ट! ATMमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, माहित नसल्यास भरावा लागेल दंड

SBI अलर्ट! ATMमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, माहित नसल्यास भरावा लागेल दंड

जर तुमच्याकडे एसबीआय (SBI State Bank of India) चे एटीएम कार्ड आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठीच्या नियमात बदल झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जुलै : जर तुमच्याकडे एसबीआय (SBI State Bank of India) चे एटीएम कार्ड आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठीच्या नियमात बदल झाले आहेत. कारण एटीएममधून पैसे काढताना जे शुल्क आकारले जायचे, त्यावर लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यावेळी सूट देण्यात आली. ही सूट 30 जून 2020 पर्यंत देण्यात आली होती. त्यामुळे आता 1 जुलैपासून एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याचे नियम देखील बदलणार आहेत. जाणून घ्या काय आहेत नवे नियम

- ज्या एसबीआय ग्राहकांच्या खात्यामध्ये दरमहा 25000 रुपये असतात, ते ग्राहक कोणतेही शुल्क न देता 8 वेळा एटीएम ट्रान्झॅक्शन करू शकतात. ज्यामध्ये 5 वेळा एसबीआयच्या एटीएममधून तर 3 वेळा अन्य बँकेच्या एटीएममधून ते पैसे काढू शकतात.

(हे वाचा-FD पेक्षा जास्त नफा देणारी सरकारची नवी योजना, दर सहा महिन्यांनी होणार फायदा)

-महिन्याला बचत खात्यामध्ये 25000 ते 50000 हजार सरासरी शिल्लक ठेवणारे ग्राहक महिन्यातून 10 वेळा मोफत ट्रान्झॅक्शन करू शकतात.

-महिन्याला बचत खात्यामध्ये  50000 ते 1 लाख रुपयांपर्यंत हजार सरासरी शिल्लक ठेवणारे ग्राहक महिन्यातून 10 वेळा मोफत ट्रान्झॅक्शन करू शकतात.

-खात्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त शिल्लक रक्कम ठेवणारे ग्राहक कितीही वेळा पैसे काढू शकतात. त्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

-फ्री लिमिट नंतर पैसे काढल्यानंतर एसबीआयकडून 8 रुपये दंड आकारला जातो.

(हे वाचा-ल्वेच्या खासगीकरणाची तयारी: सरकारची मोठी घोषणा; 109 मार्गांवर प्रायव्हेट ट्रेन)

-भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार मेट्रो शहरांमध्ये एसबीआय एका महिन्यामध्ये त्यांच्या खातेधारकांना 8 मोफत ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी देते. याव्यतिरिक्त करण्यात येणाऱ्या व्यवहारावर शुल्क आकारले जाते.

-गैर-मेट्रो शहरांमध्ये अशाप्रकारेच 10 ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी आहे. ज्यामध्ये 5 ट्रान्झॅक्शन एसबीआयच्या एटीएममध्ये तर 5 अन्य बँकेच्या एटीएममधून करण्याची परवानगी आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 2, 2020, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading